Ganesh Chaturthi 2025 Niyam : गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. द्रिक पंचांगानुसार, यंदा गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी बुधवारी आहे आणि हा सण १० दिवस चालेल. यंदा तुम्हालाही जर बाप्पा आपल्या घरी आणायचे असतील, तर स्थापनेसंबंधी नियम आधीपासून जाणून घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा गणपती बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद देतात, त्यामुळे त्यांची स्थापना करून आणि सेवा करून त्यांची कृपा मिळू शकते. चला तर मग, बाप्पाची स्थापना करण्याचे काही महत्त्वाचे नियम पाहूया.

गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त

द्रिक पंचांगानुसार, यंदा गणेश चतुर्थी २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१:५४ वाजता सुरू होऊन २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०३:४४ वाजता संपेल. गणपतीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी २७ ऑगस्ट २०२५ हा दिवस सर्वात शुभ आहे. सकाळी किंवा दुपारी शुभ मुहूर्तात बाप्पा आपल्या घरी आणा आणि ६ सप्टेंबर २०२५ रोजी मुहूर्त पाहून गणपती विसर्जन करा. हा दिवस अनंत चतुर्दशीचा आहे.

गणेशाची स्थापना करण्यापूर्वी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या…

गणेश चतुर्थीला पूजा करण्यासाठी बाप्पाची स्थापना करा आणि काही नियम पाळा.

गणपतीची सोंड कोणत्या बाजूला आहे यावर लक्ष द्या. अशी मूर्ती घरात आणा, ज्याची सोंड डाव्या बाजूला असेल. अशा रूपात बाप्पाची पूजा केल्यास लवकर शुभ फळ मिळते.

  • पूजेसाठी जागा स्वच्छ करा आणि गणपतींची मूर्ती ठेवण्यापूर्वी त्या जागी गंगाजल शिंपडा.
  • मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नका. एक स्वच्छ लहान टेबल किंवा पाटावर लाल किंवा पिवळा कपडा टाका, त्यानंतर मूर्ती ठेवा.
  • शास्त्रानुसार, जर घरात मातीची मूर्ती आणून पूजा केली तर हे खूप शुभ ठरेल.
  • बाप्पाची मूर्ती बसवताना शुभ मुहूर्ताचा विचार करा. मूर्ती फक्त चतुर्थी तिथीतच बसवावी.
  • गणपतींची मूर्ती योग्य दिशेत, म्हणजे उत्तर-पूर्व दिशेत ठेवा. पूजा करण्यासाठी ही दिशा खूप शुभ असते.
  • गणपतीच्या मूर्तीचा आकार लक्षात ठेवा. मूर्ती खूप मोठी नसावी, घरात लहान मूर्ती बसवणे उत्तम मानले जाते.
  • गणपतींच्या पूजेत अष्टगंध आणि दुर्वा अर्पण केल्यास खूप शुभ फळ मिळते.
  • गणपतीसाठी नैवेद्य म्हणून मोदक अर्पण करा. मोदक गणपतीला खूप आवडतात.
  • स्थापनेनंतर दहा दिवस सकाळ आणि संध्याकाळ नियमितपणे विधीपद्धतीने गणपतीची पूजा आणि आरती करा.