गणेश चतुर्थी २०२५ : सुख-समृद्धी, ज्ञान आणि सौभाग्याचे देव श्री गणेशाच्या आगमनाची भक्तांना आतुरतेने वाट पाहिली जाते. यावर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी आहे. या दिवसापासून १० दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो, जो अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. या काळात घरोघरी बाप्पा बसवले जातात, मंडप सजवले जातात, फुलांची आरास केली जाते आणि मोठ्या उत्साहात सण साजरा होतो.
मान्यतेनुसार या १० दिवसांत गणपती बाप्पा भक्तांचे दु:ख दूर करतात. बरेच लोक या दिवशी व्रत करतात, तसेच बाप्पांना विविध प्रकारचा नैवेद्य अर्पण करतात. गणपतींला मोदक अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे येथे ५ प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया.
१. मावा मोदक (Mawa Modak)
गणेश चतुर्थीला आपण मलाईदार मावा मोदक बनवू शकतो. यासाठी मिल्कमेड, दूध, तांदळाचे पीठ, तूप आणि वेलची लागते. हे मोदक काही मिनिटांत तयार होतात. त्यात पडणारी वेलचीची सुगंधी चव खूपच छान लागते.
मावा मोदक रेसिपी
साहित्य
- २ कप मावा
- १ कप मिल्कमेड
- १ टेबलस्पून तूप
- १ चमचा वेलची पावडर
कृती
- कढईत मावा टाकून मंद आचेवर परतून घ्या.
- त्यात मिल्कमेड घालून छान हलवा.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
- शेवटी वेलची पावडर टाका आणि नीट हलवा.
- थोडं थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात भरून मोदकाचा आकार द्या.
२. चॉकलेट मोदक (Chocolate Modak)
यावेळी जर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर चॉकलेट मोदक उत्तम पर्याय आहे. हे मोदक बाहेरून कडत असले तरी तोंडात टाकताच विरघळून जातात. मुलांना तसेच मोठ्यांनाही आवडणारा हा खास मोदक गणेशोत्सवासाठी परफेक्ट आहे.
चॉकलेट मोदक रेसिपी
साहित्य
- १ कप मावा
- ½ कप मिल्कमेड
- अर्धा कप चॉकलेट (किसलेले किंवा वितळवलेले)
- १ टेबलस्पून तूप
कृती
- कढईत मावा थोडा भाजून घ्या.
- त्यात मिल्कमेड घालून मिसळा.
- त्यात किसलेले चॉकलेट किंवा वितळवलेले चॉकलेट टाका.
- मिश्रण नीट घट्ट झाल्यावर थोडं गार करा.
- मोदक साच्यात भरून चॉकलेट मोदक तयार करा.
३. नारळ मोदक (Coconut Modak)
नारळाची बर्फी आपण सगळ्यांनीच खाल्ली आहे. पण त्याच नारळापासून आपण मोदकही बनवू शकता. यासाठी ताजा नारळ, मिल्कमेड आणि साखर लागते. बनवायला अगदी सोपे आणि चवीला उत्तम असल्यामुळे गणेश चतुर्थीच्या नैवेद्यासाठी हे मोदक नक्कीच करून पहा.
नारळ मोदक रेसिपी
साहित्य
- २ कप किसलेला ताजा नारळ
- १ कप मिल्कमेड
- अर्धा कप साखर
- १ चमचा वेलची पावडर
कृती
- पॅनमध्ये नारळ आणि साखर टाकून हलक्या आचेवर शिजवा.
- त्यात मिल्कमेड घालून नीट मिसळा.
- मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
- वेलची टाकून गार होऊ द्या.
- साच्यात भरून नारळाचे मोदक तयार करा.
४. चॉकलेट-टूटी फ्रूटी मोदक (Chocolate-Tootie Fruity Modak)
चॉकलेट आणि टूटी-फ्रूटी एकत्र करून तयार केलेले मोदक खास मुलांना खूप आवडतात. मिल्कमेडची मलाई, चॉकलेटची मऊसर चव आणि टूटी-फ्रूटीची गोडी यामुळे हे मोदक चवीला भन्नाट लागतात. सणासुदीला वेगळेपण आणण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
चॉकलेट-टूटी फ्रूटी मोदक रेसिपी
साहित्य
- १ कप मावा
- अर्धा कप मिल्कमेड
- अर्धा कप चॉकलेट
- पाव कप टूटी-फ्रूटी
१ टेबलस्पून तूप
कृती
- कढईत मावा थोडा भाजा.
- त्यात मिल्कमेड आणि वितळलेले चॉकलेट मिसळा.
- मिश्रण घट्ट होताच टूटी-फ्रूटी घाला.
- थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात भरून द्या.
५. मावा मिठाई मोदक (Mawa Mithai Modak)
मावा मिठाई मोदक हे गोडवा आणि मलाईदार पोत यांचे सुंदर मिश्रण आहे. नेस्ले मिल्कमेड आणि वेलची यांच्या स्वादामुळे हे मोदक पारंपरिकतेला आधुनिक टच देतात. हे मोदक मऊसर असून प्रत्येक घास गोड आणि खास वाटतो. गणेशोत्सवात हा मोदक नक्की करून पहा.
मावा मिठाई मोदक रेसिपी
साहित्य
- २ कप मावा
- १ कप मिल्कमेड
- अर्धा कप पिठीसाखर
- १ चमचा वेलची पावडर
- सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स
कृती
- कढईत मावा भाजून घ्या.
- त्यात मिल्कमेड आणि साखर घालून नीट मिसळा.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहा.
- वेलची आणि ड्रायफ्रूट्स घालून गॅस बंद करा.
- मिश्रण गार झाल्यावर साच्यात भरून मोदक तयार करा.