डोंबिवली- घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांना सात दिवसांच्या बाप्पाचे वाजत गाजत, मिरवणुकीने विसर्जन करता यावे यासाठी येथील कलारंग प्रतिष्ठान ढोल ताशा पथकाने ‘गणरायाची वारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जाणाऱ्या गणेश भक्तांना सहभागी करुन घेतले जाते. एकत्रितपणे मिरवणुकीने वाजत-गाजत बाप्पांचे पालिकेच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले जाते.

मागील तीन वर्षापासून कलारंग प्रतिष्ठान हा उपक्रम डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर राबवित आहे. सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करताना घरगुती गणेश भक्त आपल्या खासगी वाहनाने, घरातील चार ते पाच सदस्यांच्या उपस्थितीत विसर्जन स्थळी जातात. अशा घरगुती गणेश भक्तांना मिरवणुक, ढोल-ताशा पथकांमध्ये नृत्य करत विसर्जन स्थळी जाता यावे म्हणून कलारंग प्रतिष्ठानने फडके रस्त्यावर गणरायाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे.सात दिवसांच्या गणपती बाप्पांसाठी हा उपक्रम असतो. फडके रस्त्यावरील गणेश मंदिराजवळ कलारंग प्रतिष्ठानकडून बाप्पाच्या मिरवणुकीसाठी हातगाड्या सजवून सज्ज ठेवलेल्या असतात. घरगुती गणेश भक्तांना याठिकाणी एकत्र येण्याचे आवाहन केले जाते. काही भक्त स्वताहून या उपक्रमात सहभागी होतात. या उपक्रमासाठी भक्तांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, असे कलारंग प्रतिष्ठानचे नेहाल थोरावडे यांनी सांगितले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बस थांब्यांना खासगी वाहनांचा विळखा

सजविलेल्या हातगाड्यांवर घरगुती गणपती भक्तांकडून विसर्जनासाठी ठेवले जातात. संध्याकाळी सहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात केली जाते. ढोल-ताशांचा गजर, लेझिम पथके, गुलालाची उधळण, भजन गात आनंदाने भक्त या मिरवणुकीत सहभागी होतात. या उपक्रमात सहभागी गणेश भक्तांना पारंपारिक लेझीम, बर्ची नृत्याचा आनंद घेता येतो. बालगोपाळ या उत्साहात सहभागी होतात.यावेळी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता फडके रस्ता येथून गणरायाच्या वारीला सुरुवात होईल. दोन तास ही मिरवणुक काढली जाणार आहे. फडके रस्त्यावरील गणेश मंदिरापासून मिरवणुकीला सुरूवात होईल. मदन ठाकरे चौक, टिळक रस्ता, ब्राह्मण सभा ते नेहरू मैदान मार्गाने विसर्जन मिरवणूक नेहरू मैदान येथे पोहचेल. तेथे सुमारे २०० भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गणरायाची महाआरती केली जाते, असे थोरावडे यांनी सांगितले.

“ घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भक्तांना एकत्रितपणे विसर्जन मिरवणुकीचा लाभ घेता यावा. खाडी किनारच्या गणेश घाटांवर अनेक भाविकांना जाता येत नाही. त्यांना गावातच आनंदाने बाप्पा विसर्जन करता यावेत. हा या उपक्रमामागील उद्देश आहे.”-नेहाल थोरावडे,कलारंग प्रतिष्ठान पथक,डोंबिवली.

Story img Loader