हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे यंदाचे ४३ वे वर्ष असून या वर्षी मंडळातर्फे ‘काश्मीरच्या दल सरोवरातील हाउसबोट’ हा अतिभव्य देखावा तयार करण्यात येत आहे.
हा देखावा नव्वद फूट लांब, चाळीस फूट रुंद आणि पंचवीस फूट उंच असणार आहे. तसेच हा देखावा दुमजली आहे. देखाव्याच्या मध्यभागी असणाऱ्या सिंहासनावर गणेशमूर्ती विराजमान होणार असून मूर्तीच्या दोन्ही बाजूस जाण्या-येण्यासाठी जिन्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोनेरी, लाल, क्रिम आणि ऑफ व्हाइट अशा रंगांमध्ये हाउसबोट रंगवण्यात आली आहे. हाउसबोटीसमोर तीस फूट रुंद आणि चाळीस फूट लांबीच्या तळे असणार आहे. त्यामध्ये काश्मीरचं प्रतीक असलेले चार शिकारे असतील. देखाव्याची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांची आहे. देखाव्याचे कलादिग्दर्शन व निर्मिती कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2013 रोजी प्रकाशित
हुतात्मा बागू गेनू मंडळाचा यंदा ‘दल सरोवरातील हाउसबोट’ देखावा
हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे यंदाचे ४३ वे वर्ष असून या वर्षी मंडळातर्फे ‘काश्मीरच्या दल सरोवरातील हाउसबोट’ हा अतिभव्य देखावा तयार करण्यात येत आहे. हा देखावा नव्वद फूट लांब, चाळीस फूट रुंद आणि पंचवीस फूट उंच असणार आहे.
First published on: 05-09-2013 at 02:34 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year dal sarowaratil houseboat pomp of martyr babu genu mandal