News Flash

Gudi Padwa 2017 : स्वागतयात्रा अशा निघणार..

लोकमान्य टिळकांचे १६०व्या जयंतीनिमित्त विशेष रांगोळी काढण्यात आली आहे.

gudi padwa
'हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा

पर्यावरण, कृषिसंस्कृतीचा मिलाफ

आयोजक : श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे

’ प्रारंभ ठिकाण : कौपिनेश्वर मंदिर, वेळ : सकाळी ६.४५

स्वागतयात्रेची वैशिष्टय़े

’ स्वागत यात्रेमध्ये ५० हून अधिक चित्ररथांचा सहभाग

’ शहरातील १६ वर्षे जुनी भव्य स्वागतयात्रा

’ पाणीटंचाई, सौरऊर्जेचा वापर, वृक्षसंपदा संरक्षण, वाहतूक नियम, वारकरी दिंडी, तारफा नृत्य, जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिक, पाणी वाचवा, शेतकरी वाचवा, स्मार्ट सिटी या विषयावर आधारित चित्ररथ

’ प्रमुख पाहुणे : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे.

’ रांगोळ्यांच्या पायघडय़ा : संस्कारभारती कोकण प्रांत ठाणे समितीतर्फे श्रीराम व्यायाम शाळेच्या पटांगणात ४ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांचे १६०व्या जयंतीनिमित्त विशेष रांगोळी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर -फोटो सर्कल आणि श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राम व्यायामशाळी पटांगणात गेल्यावर्षीच्या नववर्ष स्वागतयात्रेच्या छायाचित्रांचे प्रदर्शन.

स्वागतयात्रेचा मार्ग

कौपीनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान, श्री सिद्धी विनायक मंदिर, रंगोबापूजी गुप्ते चौक, समर्थ मंदिर, सेंट जॉन शाळा मार्ग, दगडी शाळेजवळ (चित्ररथांचा शिस्तीत पालखीबरोबर सहभाग) श्रीगजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल, विष्णू नगर, घंटाळी चौक, गोखले मार्ग, समर्थ भांडार येथून राम मारुती रोड, संत राम मारुती चौक तेथून आमंत्रण हॉटेल, तलावपाळीवरून साईप्रसाद हॉटेल, डॉ. पंडित हॉस्पिटल नौकाविहार कोपऱ्यात वळून रंगोबापूजी गुप्ते चौकामध्ये (रथयात्रेची सांगता), पालखी आणि पादचारी मराठी ग्रंथसंग्रहालय, मामलेदार कचेरीमार्गे कौपिनेश्वर मंदिर. मंदिरातील महाआरती आणि प्रसादवाटपानंतर समारोप.

डोंबिवली

मुख्य स्वागतयात्रा

आयोजक – श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली

’ प्रारंभ ठिकाण – गणेश मंदिर, वेळ – सकाळी ६ वाजता

स्वागतयात्रेची वैशिष्टय़े

’ शहरातील १९ वर्षे जुनी स्वागतयात्रा

’स्वागतयात्रेत ५० हून अधिक चित्ररथांचा समावेश

’भविष्याचा वेध घेणारी डोंबिवली या विषयावर आधारित विविध चित्ररथ

’ रांगोळ्यांच्या पायघडय़ा

संस्कार भारती संस्थेच्या वतीने यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे.

स्वागतयात्रेचा मार्ग

श्री गणेश मंदिरात सकाळी ५.३० वाजता गणेशाची महापूजा व पालखीपूजन, पालखीचे गणेश मंदिरातून स्वागतयात्रेसाठी प्रस्थान, सकाळी ६.३० वाजता कान्होजी जेधे मैदान (भागशाळा मैदान) डोंबिवली पश्चिम येथून स्वागतयात्रेस सुरुवात होईल. पंचांगवाचन व गुढीपूजन सकाळी ८.४५ वाजता श्री गणेश मंदिर येथे होईल. भागशाळा मैदान येथून स्वागतयात्रेस सुरुवात होऊन सुभाष रोड, नाना शंकरशेट पथ, घनश्याम गुप्ते रोड, विष्णूनगर पोलीस स्टेशन, द्वारका हॉटेल, पूर्व-पश्चिम रेल्वे पूल, आई बंगला, गिरनार चौक, चार रस्ता, मानपाडा रोडमार्गे, बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक येथे स्वागतयात्रेचा समारोप सकाळी १० वाजता होईल.

कल्याण-डोंबिवली ग्रामीण

’ आयोजक – पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व आनंद वारकरी संप्रदाय पंथ

’ प्रारंभ ठिकाण – स्टार कॉलनी गणेश मंदिर, डोंबिवली व कल्याण-शीळ रोड, दावडी गणेश मंदिर येथून सुरुवात, वेळ – स.६.३० वा.

’ स्वागतयात्रेची वैशिष्टय़े

’ स्वागतयात्रेत सहभागी पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, बैलगाडय़ा, वारकरी संप्रदाय, लेझीम, झांज पथक, पाणी बचतीचे संदेश देणारे चित्ररथ

’ स्वागतयात्रेचा मार्ग – स्टार कॉलनी, गणेशनगर गणपती मंदिर, डोंबिवली पूर्व येथून सुरुवात, मानपाडा मार्गे, सागाव सागर्ली भागातून पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे मार्गस्थ, तर दावडीतील गणेश मंदिरमधील पालखी कल्याण शीळ मार्गे पिंपळेश्वर मंदिर.

कल्याण

हिंदू नववर्ष स्वागतयात्रा कल्याण पश्चिम

’आयोजक – कल्याण संस्कृती मंच संचालित याज्ञवल्क्य संस्था

’ठिकाण – सिंडीकेट, कल्याण (प.), वेळ – सकाळी ६.३० वाजता

स्वागतयात्रेची वैशिष्टय़े

’ नववर्ष स्वागतयात्रेत ६० चित्ररथ सहभागी होतील

’ नोटाबंदी, अंतराळात सोडण्यात आलेले १०४ उपग्रह, लक्ष्यवेधी कारवाई (सर्जिकल स्ट्राइक) अशा प्रकारे चित्ररथ, सामाजिक संदेश बेटी बचाओ, स्मार्ट सिटी यांविषयीचे चित्ररथ

स्वागतयात्रेचा मार्ग

सिंडीकेट, आयुक्त बंगला, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक, पारनाका, लालचौकी येथील शारदा मंदिर शाळेत समारोप

बदलापूर

आयोजक :- श्री हनुमान मारुती देवस्थान आणि नववर्ष स्वागतयात्रा समिती

’ सुरुवात : दत्तचौक बदलापूर पश्चिम, गणेश मंदिर, मांजर्ली. मोहनानंद नगर, सवरेदयनगर, बाजारपेठ, उड्डाण पूल, स्टेशन पूर्व, कुळगाव सोसायटी,  शिवाजी चौक, गोळेवाडी, मारुती मंदिर, गांधी चौक (समारोप)

’ उपयात्रा : हेंद्रेपाडा- श्री साई शाम देवस्थान

’ कात्रप : अष्टगंध अध्यात्म व्यासपीठ

’ शिरगाव- मारुती मंदिर शिवाजी चौक : नरेंदचार्यजी महाराज सेवाकेंद्र

विशेष आकर्षण

विविध संस्थांकडून रंगीबेरंगी रांगोळ्या, लेझीम पथक, गर्जा ढोल पथकाचे वादन, दिमाखदार शोभायात्रा, चित्ररथ आणि विविध उपयात्रा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सामाजिक सेवा पुरस्काराने गौरव.

अंबरनाथ

आयोजक- भारतीय नववर्ष स्वागतयात्रा समिती व ब्राह्मण सभा महिला शाखा

’शोभायात्रेची सुरुवात : यंदा नववर्षांचे स्वागत करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम अशा दोन मुख्य स्वागतयात्रा निघतील. पूर्वेकडून सर्व विभागांतील उपयात्रा वडवली वेल्फेअर सेंटरजवळ एकत्र येऊन शिवाजी चौकात मुख्य गुढी उभारून हुतात्मा चौकात येतील.

’पश्चिमेकडील सर्व उपयात्रा महात्मा गांधी विद्यालयाजवळ एकत्र येऊन पूर्व आणि पश्चिमेकडच्या दोन्ही मुख्य स्वागतयात्रांचा समारोप हुतात्मा चौकात होणार आहे. प्राचीन शिवमंदिरात गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी सात वाजता जलाभिषेक करण्यात येणार आहे.

’विशेष आकर्षण : महिला दुचाकी रॅली, सायकल रॅली, लेझीम आणि झेंडे पथक, मल्लखांब पथक, योगासन पथक तसेच विविध संस्थांचे चित्ररथ.

(संकलन- शलाका सरफरे, शर्मिला वाळूंज, सागर नरेकर )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 2:18 am

Web Title: gudi padwa 2017 gudi padwa swagat yatra 2017 route in thane district
Next Stories
1 Gudhi Padwa 2017: तयारी शोभायात्रांची
2 Gudhi Padwa 2017 : गुढी कशी उभारावी?
3 Gudhi Padwa 2017: गुढीपाडव्याचं महत्त्व
Just Now!
X