असे का होते?
आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूतील उष्णता तसेच, खाल्ल्या जाणाऱ्या आम्ल, शीत व द्रव पदार्थामुळे काही व्यक्तींमध्ये हे लक्षण पाहावयास मिळते.
उपाय काय?
* लक्षण दिसताक्षणी झोपावे व मध्यावर थंड पाण्याची धार धरावी.
* रक्त थांबल्यानंतर साजूक गाईचे तूप २-२ थेंब दोन्ही नाकपुडीत
सोडावे.
* थंड दूध किंवा डािळबाचा रस प्यायला द्यावा. वारंवार तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
यामुळे काय होते?
रक्तप्रवाह थांबतो व शरीरातील उष्णता कमी होते.
इतर काय काळजी घ्यावी?
* लोणचे, दही, तिखट पदार्थ खाऊ नयेत.
* लसूण, शेवया, मेथी यांचा वापर टाळावा.
* आहारात दूध, तूप, पुदिना यांचा वापर करावा.
* उन्हात फिरू नये.
वैद्य सदानंद सरदेशमुख