01 April 2020

News Flash

समाजोपयोगी

दुर्लक्षित घटकांसाठी हेल्पलाइन्स ठरत असलेल्या काही समाजसेवी संस्थांचा परिचय आपण करून घेत आहोत.

समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी हेल्पलाइन्स ठरत असलेल्या काही समाजसेवी संस्थांचा परिचय आपण करून घेत आहोत. आज आणखी काही संस्थांची माहिती –

शबरी सेवा समिती – रायगड, ठाणे, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्य़ांत कार्यरत असलेल्या या संस्थेचे कुपोषण निर्मूलन हे प्रमुख उद्दिष्ट आहे. तेथील समाजाला शैक्षणिक, वैद्यकीय, कृषीविषयक मार्गदर्शन तसेच मदत या संस्थेतर्फे केली जाते. शिवाय युवती प्रबोधनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘पुस्तक हंडी’चा उपक्रम राबवला जातो. संपर्कासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक – प्रमोद करंदीकर – ९९२०५१६४०५, एस.जे. पांढारकर – ९७५७१२५०१०, दीपाली निमकर – ९८१९५८७०६४.

प्राइड इंडिया (प्लॅनिंग रुरल-अर्बन इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन) – रायगड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्य़ांमधील ग्रामीण भागांतील गरिबांचा सर्वागीण विकास व्हावा या हेतूने ही संस्था कार्यरत आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – मुंबई – २६५२०६०१, २६५२०६०२, महाड, रायगड – ०२१४५-२२२४९२, सास्तूर, उस्मानाबाद – ०२४७५-२५९५८०.

जरूरत – अ नीड – एखाद्या व्यक्तीकडच्या टाकाऊ  वस्तू दुसऱ्या व्यक्तीच्या प्राथमिक गरजा भागवू शकतात, या मुख्य विचारावर या संस्थेचे कार्य चालते. नको असलेल्या, टाकाऊ  परंतु चांगल्या स्थितीतील वस्तू ग्रामीण व शहरी

भागातील गरिबांना देण्यासाठी ही संस्था काम करते. वस्तूंचा योग्य पुनर्वापर करून त्यायोगे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा या संस्थेचा उद्देश आहे. मुंबईत ठिकठिकाणी या संस्थेतर्फे वस्तू गोळा केल्या जातात. आवश्यकतेप्रमाणे त्यांची दुरुस्ती केली जाते आणि नंतर वाटप केले जाते. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ६५८८६६४९, ९९६७५३८०४९.

ग्रीन सोल – नको असलेली, वापरात नसलेली पादत्राणे गोळा करून, दुरुस्त करून स्वयंसेवी संस्थेतर्फे गरजूंना पुरवण्याचे काम ही संस्था करते. या पादत्राणांपैकी काहींची विक्री करून जमा झालेला निधी या कामाचा खर्च भागवण्यासाठी वापरला जातो. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ९६६४२२५८१५, ९६१९९८९१९५, ९८१९४५१८०५.

सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आणखी काही संस्थांची माहिती पुढच्या सदरात. या संस्थांच्या कार्याला आपणही हातभार लावायला हवा ना?

शुभांगी पुणतांबेकर – puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2016 12:48 am

Web Title: non profit organizations helpline for ignore society elements
Next Stories
1 फोनवरूनच व्यवहार
2 हेल्पलाइन्स
3 समाजोपयोगी संस्था
Just Now!
X