04 December 2020

News Flash

दोषी विराट कोहलीला फक्त समज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी नियमाचा भंग केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली दोषी आढळला होता.

| May 20, 2015 12:47 pm

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी नियमाचा भंग केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली दोषी आढळला होता. मात्र ही किरकोळ चूक असल्याने कोहलीला अभय देण्यात आले आहे.
बंगळुरू येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यादरम्यान पावसामुळे खेळ थांबलेला असताना विराट कोहलीने गर्लफ्रेंड अनुष्का शर्माची भेट घेतली होती. ड्रेसिंगरूम शेजारीच असलेल्या व्हीआयपी कक्षात उपस्थित अनुष्काची विराटने भेट घेतली. खेळाडूंनी सामना सुरू असताना कुठे वावरावे यासंदर्भातील ५.१.२  नियम कोहलीने मोडला.बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रवी सवानी यांनी कोहलीला नियमभंगाची कल्पना दिली. मात्र ही किरकोळ चूक असल्याने सवानी यांनी कोहलीला शिक्षा न करता सोडून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2015 12:47 pm

Web Title: virat kohli gets warning for chatting with anushka sharma
Next Stories
1 आज काही तुफानी करू या!
2 बांगलादेश दौरा माझ्यासाठी नवी सुरूवात- हरभजन सिंग
3 मॅच विनर: ‘भज्जी’ तुस्सी छा गये
Just Now!
X