IPL 2020: मुंबईच्या ‘हिटमॅन’चं अनोखं द्विशतक, पाहा आकडेवारी

विक्रमवीरांच्या यादीत चौथा

४. रोहित शर्मा – २००

Dream11 IPL 2020 UAE : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला दमदार सुरूवात मिळवून देणारा क्विंटन डी कॉक कोलकाताच्या शिवम मावीचा पहिला बळी ठरला. दुसऱ्याच षटकात तो १ धाव काढून माघारी परतला. पण रोहितशर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी सुरूवात केली.

रोहित शर्माने IPL2020 च्या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडू पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. पॅट कमिन्सला कोलकाताने १५.५० कोटींमध्ये विकत घेतले. तो आज पाचवं षटक टाकायला आला. पहिला चेंडू त्याने वाइड टाकला. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर रोहितने उत्तुंग असा षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतरही त्याने पॅट कमिन्सचा जोरदार समाचार घेतला. त्यानंतरही रोहितने फटकेबाजी सुरूच ठेवली. कुलदीप यादवला षटकार लगावत रोहित शर्माने IPLकारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण केले. तो त्याचा डावातील सहावा षटकार होता.

IPL कारकिर्दीत २०० षटकार लगावणारा रोहित चौथा खेळाडू ठरला. या यादीत सर्वाधिक ३२६ षटकारांसह ख्रिस गेल अव्वल, २१४ षटकारांसह डीव्हिलियर्स दुसरा तर २१२ षटकारांसह धोनी तिसरा आहे. त्यापाठोपाठ आज रोहितने २०० षटकारांचा टप्पा गाठला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rohit sharma completes 200 sixes in ipl career becomes only fourth player record mi vs kkr ipl 2020 vjb

ताज्या बातम्या