25 September 2020

News Flash

IPL 2020 : CSK संघात रैनाच्या जागी ड्वाइड मलानला संधी??

CSK चे CEO म्हणतात...

फोटो - AP

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपरकिंग्ज संघाला धक्का बसला. संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने खासगी कारण देत संपूर्ण हंगामातून माघार घेतली. रैनाच्या परिवारातील सदस्याला पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. अशावेळी आपल्या परिवारासोबत असणं अधिक गरजेचं असल्याचं वाटल्यामुळे रैना भारतात परतला. CSK ने अद्याप रैनाच्या ऐवजी संघात बदली खेळाडूला जागा दिलेली नाही. रैना यंदाच्या हंगामात पुनरागमन करेल अशीही चर्चा सुरु होती. परंतू आता CSK संघ व्यवस्थापन इंग्लंडच्या ड्वाइड मलानला रैनाच्या जागी संघात स्थान देण्याच्या विचारात आहे अशी काही प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे.

अवश्य वाचा – Video : सरावादरम्यान धोनीने मारलेला सिक्स थेट मैदानाबाहेर, मुरली विजयही झाला अवाक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडलेल्या टी-२० मालिकेत मलानने इंग्लंडकडून चांगला खेळ केला. CSK चं संघ व्यवस्थापन मलानच्या खेळामुळे प्रभावित झालंय. “सध्या फक्त चर्चा सुरु आहे. कोणतीही गोष्ट अंतिम झालेली नाही. मलान हा चांगला टी-२० खेळाडू आहे. रैनाप्रमाणे तो देखील डावखुरा फलंदाज आहे. परंतू आम्ही रैनाच्या बदल्यात कोणाला संधी द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.” सूत्रांनी Inside Sport ला माहिती दिली.

परंतू चेन्नई सुपरकिंग्जचे CEO काशी विश्वनाथन यांनी मलानला रैनाच्या जागी संधी देण्याबाबतचं वृत्त फेटाळलं आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना विश्वनाथन यांनी CSK संघाचा परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण झालेला असल्यामुळे कोणत्याही नवीन खेळाडूला संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं. चेन्नईच्या संघात सध्या लुन्गिसानी एन्गिडी, इम्रान ताहीर, जोश हेजलवूड, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु-प्लेसिस, सॅम करन हे परदेशी खेळाडू आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पार पडल्यानंतर ड्वाइड मलानने आयसीसी टी-२० क्रमवारीत बाबर आझमला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. ३ सामन्यांत मलानने १२९ धावा पटकावल्या. ज्यात पहिल्या सामन्यातील ६६ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. बिग बॅश लिग स्पर्धेतील संघही मलानला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. परंतू मलानने याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 1:29 pm

Web Title: dawid malan identified as suresh rainas replacement csk yet to take final call on england star psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 कोहली सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज -स्मिथ
2 Video : सरावादरम्यान धोनीने मारलेला सिक्स थेट मैदानाबाहेर, मुरली विजयही झाला अवाक
3 Video : पाँटींगच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यचा फलंदाजीचा सराव
Just Now!
X