आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला म्हणावा तसा सूर अद्याप सापडलेला दिसत नाही. सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात १६५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस या चेन्नईच्या सलामीवीरांकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. परंतू दोघांनीही आज निराशा केली.
भूवनेश्वर कुमारने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत चेन्नईला पहिला धक्का दिला. वॉटसन ६ चेंडूत अवघी एक धाव काढू शकला. आयपीएलमध्ये शेन वॉटसनला सर्वाधिकवेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार आता पहिल्या स्थानावर आला आहे. वॉटसनला माघारी धाडण्याची भूवनेश्वरची आयपीएलमधली ही चौथी वेळ ठरली आहे.
Pacers to dismiss Watson (most times in IPL)
Bhuvi – 4*
Malinga – 3
RP Singh – 3
Bravo – 3#CSKvsSRH— CricBeat (@Cric_beat) October 2, 2020
भूवनेश्वरने वॉटसनला माघारी धाडल्यानंतर अंबाती रायुडू, फाफ डु-प्लेसिस आणि केदार जाधव हे फलंदाजही स्वस्तात माघारी परतले. सुरुवातीच्या षटकांमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही.