28 October 2020

News Flash

IPL 2020 : सव्याज परतफेड ! चार वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा अक्षर पटेलने काढला वचपा

दिल्लीची चेन्नईवर ५ गडी राखून मात

फोटो सौजन्य - IPL

आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून अवघी काही पावलं दूर आहे. शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्जवर ५ गडी राखून मात केली. विजयासाठी मिळालेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने शिखर धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहत शिखरने नाबाद १०१ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती आणि मैदानावर धवन व अक्षर पटेल ही जोडी होती.

अक्षर पटेलने यावेळी जाडेजाच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करत ३ षटकार लगावलत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या खेळीमुळे अक्षर पटेलला ४ वर्षांपूर्वीचा जुना हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली. २०१६ च्या हंगामात धोनीने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकांत २३ धावा काढत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर ४ वर्षांनी अक्षर पटेलने अशाच पद्धतीने दिल्लीला विजय मिळवून देत वचपा काढला.

विरेंद्र सेहवागनेही धोनीला ४ वर्षांपूर्वीच्या त्या खेळीची आठवण करुन देत चिमटा काढला आहे. पाहा काय म्हणतोय विरु…

चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत दिल्लीला झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. शिखर धवनने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत ५८ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०१ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 12:07 am

Web Title: ipl 2020 csk vs dc axar patel slams 3 sixes in last over tit for tat to dhoni psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO: शेवटच्या षटकात अक्षरचं ‘दे दणादण’; धोनी, रोहित यांच्या पंगतीत स्थान
2 IPL 2020: ‘गब्बर’ धमाका! शिखर धवनचं तडाखेबाज शतक
3 IPL 2020 : शून्यावर बाद झालेला पृथ्वी ड्रेसिंग रुममध्ये थेट जेवायला बसला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Just Now!
X