01 March 2021

News Flash

IPL 2020: वॉर्नर-साहा जोडीचा दिल्लीकरांना दणका; SRHचा नवा विक्रम

SRH सलामीवीरांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं...

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने संघात महत्वाचा बदल केला. केन विल्यमसनला खेळवण्यासाठी जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवण्यात आले. तर प्रियम गर्गच्या जागी वृद्धिमान साहाला संघात घेत सलामीवीर-यष्टीकक्षक अशी दुहेरी जबाबदारी दिली. ही जबाबदारी वृद्धिमान साहाने पुरेपूर पार पाडली. सुरुवातीच्या दोन षटकांत त्याने दमदार फटकेबाजी केली. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळत दिल्लीकरांना दणका दिला.

डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर प्ले च्या ६ षटकांत तब्बल ७७ धावा कुटल्या. महत्त्वाची बाब म्हणजे यात डेव्हिड वॉर्नरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्याने अवघ्या २५ चेंडूत आपलं अर्धशतक साकारलं. यंदाच्या हंगामात पॉवरप्लेच्या षटकांमध्ये अर्धशतक ठोकणारा वॉर्नर पहिलाच खेळाडू ठरला. तर बिनबाद ७७ ही यंदाच्या हंगामातील पॉवर-प्लेमधील सर्वाधिक धावसंख्या ठरली.

दरम्यान, हैदराबादने ५२ चेंडूत (८.४ षटकांत) शतकही गाठले. यात वॉर्नरच्या ६२(३२) तर साहाच्या ३८(२१) धावा होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 8:14 pm

Web Title: ipl 2020 dc vs srh hyderabad scores highest runs in powerplay vs delhi david warner becomes first to score fifty in 6 overs wriddhiman saha joins party vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 Video: चाहत्याने साकारलेले ‘Home of Dhoni Fan’ पाहून धोनी म्हणतो…
2 IPL 2020: धोनीबद्दल CSKने दिली मोठी अपडेट
3 IPL 2020 : “गेल भैय्या आहेत King Of…”; पंजाबच्या संघाकडून मिर्झापूर स्टाइल कौतुक
Just Now!
X