02 December 2020

News Flash

IPL 2020 : रोहित शर्माचं विक्रमी ‘द्विशतक’, धोनीच्या यादीत मिळवलं स्थान

नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी

खुद्द मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही IPL मध्ये मुंबईकडून खेळण्याआधी डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या आयपीएलच्या इतिहासात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना हा रोहित शर्माचा आयपीएलमधला द्विशतकी सामना ठरला आहे. महेंद्रसिंह धोनीनंतर २०० वा सामना खेळणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार धोनीनेही यंदाच्या हंगामातच हा अनोखा विक्रम आपल्या नावे केला होता.

दरम्यान नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेक्कन चार्जर्स संघाकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रोहितने ३ वर्ष डेक्कनचं प्रतिनिधीत्व केलं. यानंतर २०११ साली मुंबई इंडियन्सने रोहितला आपल्या संघात घेतलं. यानंतर आपल्या नेतृत्वकौशल्याच्या आधारावर रोहितने मुंबई इंडियन्सला ४ विजेतेपद मिळवून दिली आहेत. त्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्यात दिल्लीचं आव्हान मोडीत काढत रोहितचा संघ पुन्हा एकदा विजयी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 7:02 pm

Web Title: ipl 2020 mi captain rohit sharma becomes 2nd player to feature 200 ipl game after dhoni psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL : कुंबळे-राहुलची जोडी करणार पंजाबचं नेतृत्व, मॅक्सवेलचं स्थान धोक्यात असल्याचे संकेत
2 IPL 2020 : मुंबईचं पारडं जण पण हे तीन फॅक्टर बदलवू शकतात सामन्याचं चित्र
3 IPL 2020 Final : फलंदाजी की गोलंदाजी, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा काय करावं?? इतिहास सांगतो…
Just Now!
X