29 November 2020

News Flash

Video : नाही, हा नक्कीच नो-बॉल नाही ! पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर माजी खेळाडूंची खोचक टीका

उदानाचा तो चेंडू पंचांनी नो-बॉल दिलाच नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल…पंचांनी दिलेले वादग्रस्त निर्णय हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. आयपीएलच्या तेराव्या हंगामातही पंचांनी दिलेल्या दोन-तीन वादग्रस्त निर्णयांची चांगलीच चर्चा झाली होती. शनिवारी शारजाच्या मैदानावर झालेल्या हैदराबाद विरुद्ध बंगळुरु सामन्यातही पंचांचा असाच एक वादग्रस्त निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरतो आहे.

RCB ने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना दहाव्या षटकांत इसरु उदानाने टाकलेला एक चेंडू केन विल्यमसनच्या डोक्यावरुन जात होता. विल्यमसनने कसाबसा हा फटका खेळला, परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंचांनी हा चेंडू नो-बॉल ठरवला नाही. ज्यामुळे विल्यमसनलाही आश्चर्याचा धक्का बसला.

अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी पंचांच्या या वादग्रस्त निर्णयावर खोचक शब्दांत टीका केली.

दरम्यान, RCB ने दिलेल्या १२१ धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादने आश्वासक फलंदाजी करत ५ गडी राखत आव्हान पूर्ण केलं. हैदराबादच्या या विजयाने प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार झालेली असून मंगळवारी हैदराबाद आपला अखेरचा सामना मुंबईशी खेळणार आहे.त्यामुळे कोणते दोन संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 11:09 pm

Web Title: rcb vs srh kane williamson left perplexed at isuru udana no ball decision psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: हैदराबादचा धडाकेबाज विजय; ‘विराटसेने’साठी प्ले-ऑफ्सचं गणित अवघड
2 IPL 2020 RCB vs SRH: “…तर डेव्हिड वॉर्नरने सीमारेषेवर येऊन घोषणाबाजी केली असती”
3 IPL 2020 : तिच्या जेवणातून ताकद मिळते ! इशानने धडाकेबाज खेळीचं श्रेय दिलं आईला
Just Now!
X