19 January 2021

News Flash

परफ्युम वापरताना..

परफ्युमची निवड करताना मनगटाच्या मागे स्प्रे करावा व ५-१० मिनिटे थांबावे.

० परफ्युम निवडताना आपली जीवनशैली, व्यक्तिमत्त्व, छंद, व्यवसाय यांसाठी योग्य असणाऱ्या परफ्युमची निवड करावी.
० दिवसा वापरण्यासाठी मंद, मधुर सुगंध आणणारा परफ्युम वापरावा आणि संध्याकाळी, रात्रीच्या वेळी किंवा विशेष कार्यक्रमासाठी जरा उग्र वास असलेला परफ्युम वापरावा.
० परफ्युम खरेदी करताना एका वेळी आणि एकाच ठिकाणी जास्त स्प्रे ट्राय करू नका. निवड करणे कठीण होते.
० परफ्युमची निवड करताना मनगटाच्या मागे स्प्रे करावा व ५-१० मिनिटे थांबावे. तेवढय़ा वेळात सुगंध कमी झाला नाही तर तो परफ्युम योग्य समजावा.
० फक्त सुगंधावरून परफ्युमची निवड न करता त्यात असलेले घटक जाणून घ्या. कानामागे व मनगटावर स्प्रे करून रिअक्शनची टेस्ट करून पहा.
० जास्त उग्र वासाचा परफ्युम वापरल्यास सर्दी, डोकेदुखी, शिंका येणे, अलर्जी किंवा श्वासाचा त्रास होऊ शकतो. यासाठी शक्यतो नैसर्गिक सुगंध (फुलांचा सुगंध, फळांचा सुगंध किंवा चंदन) याचा वापर करावा.
० परफ्युम संपूर्ण शरीरावर स्प्रे न करता प्लस पॉइंटवर स्प्रे करावा. त्यामुळ सुगंध बराच काळ टिकून राहातो. (मनगटाची मागची बाजू, मानेच्या मागची बाजू, कानाच्या मागे, कोपराच्या आतील बाजू, अंडरआर्म इत्यादी.)
० बाहेर जाण्यापूर्वी १०-१२ मिनिटे आधी स्प्रे करावा म्हणजे सुगंध टिकून राहतो.
० परफ्युमचा वापर थेट शरीरावर करू नये. संवेदनशील त्वचा असल्यास खाज येणे, त्वचा लाल होणे, त्वचेची आग होणे अशा प्रकारचे त्रास होतात.
० उन्हाळ्यात घामामुळे केसांना घामट वास येतो अशा वेळी कंगवा किंवा हेअर ब्रशवर परफ्युमचा हलका फवारा मारून केसावर फिरवून घ्या. घामट
वास निघून जाईल. स्प्रेमध्ये अल्कोहोल असल्याने केस कोरडे होतील. त्यामुळे बेतानेच.
० घराबाहेर जाताना झीप पाऊचमध्ये परफ्युम स्प्रे करून कापसाचे बोळे सोबत ठेवावे. अधे मधे टचअपसाठी वापरता येतील.
० थंडीच्या दिवसात स्वेटर, जाकीट, शाल, मफलर अशा जास्त कपडय़ांचा वापर केला जातो. यासाठी उग्र वासांच्या परफ्युमचा वापर करावा. जास्त कपडय़ांतूनही त्याचा सुगंध कायम राहील.
० उन्हाळ्यात अल्कोहोल बेस परफ्युम असेल तर त्याचा वास लवकर उडून जातो. त्यासाठी वॉटरबेस परफ्युम वापरावा.
० गर्भवती स्त्रीने परफ्युमचा वापर करु नये.
संकलन- उषा वसंत -unangare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2015 3:40 am

Web Title: while using deodorant
Next Stories
1 करून बघावे असे :  संगणकावर काम करताना..
2 प्रवासाला जाताना ..
3 केक करण्यापूर्वी..
Just Now!
X