सामयिक प्रवेश परीक्षेशिवाय (सीईटी) नर्सिग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी चार वर्षे परवानगी दिल्यानंतर अचानकपणे परवानगी का नाकारण्यात आली, असा सवाल विनाअनुदानित नर्सिग महाविद्यालयांच्या ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड नर्सिग कॉलेज’ या संघटनेने उपस्थित केला असून, शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घ्यावी, असे म्हटले आहे.
सामयिक प्रवेश परीक्षा न घेता नर्सिग अभ्यासक्रमाला प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरवून त्यांचे निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय प्रवेश नियंत्रण समितीने घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी नर्सिग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. केला आहे. ‘प्रवेश नियंत्रण समितीने २००८ ते २०११ ही चार वर्षे रिक्त राहिलेल्या जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, समितीने प्रवेश परीक्षा न दिलेल्यांना प्रवेश देण्याची परवानगी आमच्या कक्षेत येत नाही, असे सांगत प्रवेश रद्द ठरवले. या विरोधात महाविद्यालयांच्या संघटनेनेच याचिका दाखल केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘शासनाने नर्सिगच्या विद्यार्थ्यांचे हित जपावे’
सामयिक प्रवेश परीक्षेशिवाय (सीईटी) नर्सिग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी चार वर्षे परवानगी दिल्यानंतर अचानकपणे परवानगी का नाकारण्यात आली, असा सवाल विनाअनुदानित नर्सिग
First published on: 25-01-2014 at 01:26 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government should take care of cet students