scorecardresearch

एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न

प्र. 10. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे? अ) ऑप्टिकल फायबर हे विकिकरण या तत्त्वावर कार्य करते. ब) समुद्रसपाटीपासून उंच राहणारे लोक उकळता चहा पितात, कारण वातावरणाचा दाब कमी असल्याने चहाचा उत्कलनिबदू कमी असतो. पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे. 2) ब विधान बरोबर आहे. 3) अ व ब विधान चूक आहे. 4) अ व ब विधान बरोबर आहे.

एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न

वस्तुनिष्ठ प्रश्नसंच- सामान्य विज्ञान
प्र. 10. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) ऑप्टिकल फायबर हे विकिकरण या तत्त्वावर कार्य करते.
ब) समुद्रसपाटीपासून उंच राहणारे लोक उकळता चहा पितात, कारण वातावरणाचा दाब कमी असल्याने चहाचा उत्कलनिबदू कमी असतो.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
प्र. 11. निकट दृष्टीचा मनुष्य –
पर्याय : अ) दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतो.
ब) दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही.
क) दूरच्या वस्तू पाहू शकतो, परंतु जवळच्या वस्तू पाहू शकत नाही.
ड) यांपकी नाही.
योग्य विधाने : ड्ट जवळच्या वस्तू पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू पाहण्यास त्यास त्रास होतो. (अधिक माहिती : दूरदृष्टीतेमध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात तर
जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. )
प्र. 12. बर्फ वितळताना खालीलपकी काय घडते?
पर्याय : अ) वितळताना त्याचे आकारमान व तापमान वाढते.
ब) वितळताना त्याचे आकारमान व तापमान कमी होते.
क) वितळताना त्याचे आकारमान कमी होते व तापमान कायम राहते.
ड) वितळताना त्याचे आकारमान कायम राहते व
तापमान कमी राहते.
प्र. 13. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी द्रवाचा चटकन पसरण्याचा गुणधर्म उपयोगी पडतो.
ब) फळे कापताना कापायच्या सुरीला धार लावणे आवश्यक असते, कारण सुरीवर लावलेले बळ अधिक क्षेत्रफळावर कार्य करते.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी द्रवाचा समपातळीत राहण्याचा गुणधर्म उपयोगी पडतो.
* फळे कापताना कापायच्या सुरीला धार लावणे आवश्यक असते, कारण सुरीवर लावलेले बळ कमी क्षेत्रफळावर कार्य करते. त्यामुळे अधिक दाबाची निर्मिती होते.
प्र. 14. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) कॅरम खेळण्यापूर्वी कॅरम बोर्डवर बोरिक पावडर टाकतात, कारण त्यामुळे कॅरम बोर्ड स्ट्राइकर व सोंगटय़ा यांच्या मधील घर्षण कमीतकमी राखण्यात येते.
ब) बल जेव्हा बलगाडी ओढतो तेव्हा गाडी पुढे जाते, कारण बलाकडून बलगाडीवर बल प्रयुक्त होते.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* बल जेव्हा बलगाडी ओढतो तेव्हा गाडी पुढे जाते, कारण जमिनीकडून बलांच्या पायावर बल प्रयुक्त होते.
प्र. 15. दोलकाची लांबी कमी केल्यास दोलनकाल –
पर्याय : 1) कमी होतो.
2) जास्त होतो.
3) तेवढाच राहतो.
4) दुप्पट होतो.
प्रश्नांची उत्तरे : प्र. १०- १, प्र. ११- ड, प्र. १२- क, प्र. १३३, प्र. १४- १, प्र. १५- १.
(क्रमश:)

यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
वस्तुनिष्ठ प्रश्नसंच- सामान्य विज्ञान
प्र. 11. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) अमेरिकन अवकाश संस्था ‘नासा’ने अन्य देशांच्या सहकार्याने आखलेल्या मंगळ मोहिमेअंतर्गत क्युरिऑसिटी रोव्हर ही 6 ऑगस्ट 2012 रोजी यशस्वीरीत्या मंगळावर उतरविले.
ब) या मोहिमेचा उददेश मंगळाची भुपृष्ठरचना मंगळावरील जीवसृष्टी किंवा पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे, त्याप्रमाणे मंगळावर पाणी किंवा कार्बनडायऑक्साइड
साखळीचा शोध घेणे
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान बरोबर आहे.
4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 12. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) जिमेक्स 12 हा भारत व रशिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव व युद्ध अभ्यास डिसेंबर 2012 येथे मुंबई येथे पार पडला.
ब) इंद्र हा भारत व जपान यांच्या नौदलाचा संयुक्त सराव टोकियोच्या किनारपट्टीवर पार पडला.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान बरोबर आहे.
4) अ व ब विधान चूक आहे.
(अधिक माहिती : ड्ट इंद्र हा भारत व रशिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास डिसेंबर 2012 येथे मुंबई येथे पार पडला.)
ड्ट जिमेक्स 12 हा भारत व जपान यांच्या नौदलाचा संयुक्त सराव टोकियोच्या किनारपट्टीवर जून 2012 मध्ये पार पडला.
प्र. 13. अस्त्र काय आहे?
पर्याय : 1) स्वदेशी बनावटीचे अण्वस्त्रवाहक हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, त्याचा पल्ला 45 ते 100 कि.मी. आहे.
2) अस्त्र हे वैमानिक रहित विमान आहे.
3) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अंर्तखडीय क्षेपणास्त्र आहे.
4) यांपकी नाही.
प्र. 14. ‘इको मार्क’ लेबल याविषयी कोणते विधान बरोबर आहे?
अ) ही योजना 1991 मध्ये सुरू करण्यात आली. पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या उपभोग्य वस्तूंना हे लेबल दिले जाते.
ब) मातीचे भांडे हे ‘इको मार्क’ चे लोगो आहे.
पर्याय : 1) अ व ब विधान बरोबर आहे.
2) अ व ब विधान चूक आहे.
3) अ विधान बरोबर आहे.
4) ब विधान बरोबर आहे.
प्र. 15. जीवशास्त्रीय ऑक्सिजन मागणी जास्त असेल (Biological Oxygen Demand) तर –
पर्याय : 1) ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे.
2) ते पाणी अंघोळीसाळी योग्य नाही.
3) ते पाणी कमी प्रदूषित आहे.
4) ते पाणी जास्त प्रदूषित आहे.
प्र. 16. क्ष किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो.
पर्याय : 1) रक्तक्षय होतो 2) उत्पादन क्षमता कमी होते.
3) मानसिक दौर्बल्य येते. 4) यांपकी नाही.
* क्ष किरणांमुळे आपल्या हाडांमधील बोनमॅरोवर परिणाम होतो म्हणून रक्त तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
प्र. 17. उन्हात ठेवलेला हातोडय़ाचा दांडा हातोडीच्या धातूपेक्षा कमी तापतो, कारण –
पर्याय : 1) लोखंड हे उष्णतेचे सुवाहक आहे.
2) लोखंड जास्त उष्णता शोषून घेते.
3) लोखंड लाकडापेक्षा कडक असते.
4) यांपकी नाही.
* क्ष किरणांमुळे आपल्या हाडांमधील बोनमॅरोवर परिणाम होतो म्हणून रक्त तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
प्र. 18. सौरकुकरचे झाकण हे काचेचे असते, कारण –
पर्याय : 1) काच उष्णेतेचे प्रारण शोषून घेऊ शकत नाही.
2) काचेतून सूर्यप्रकाश आत जातो, परंतु उष्णतेची प्रारणे काचेतून बाहेर जाऊ शकत नाहीत.
3) काच उष्णतेचे सुवाहक आहेत.
4) यांपकी नाही.
प्रश्नांची उत्तरे : प्र. ११- ३, प्र. १२- ४, प्र. १३- १,
प्र. १४- १, प्र. १५- ४, प्र. १६- १, प्र. १७- १, प्र. १८- २.
(क्रमश:)
– डॉ. जी. आर. पाटील
‘स्पर्धा परीक्षा गुरू’ हे स्वतंत्र, संपादकीय मजकुराचे सदर आहे.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2013 at 12:18 IST

संबंधित बातम्या