काँग्रेस पक्षाच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह दोन नगरसेवकांच्या जातीचा दाखला सोमवारी महापालिका आयुक्त पी.  शिवशंकर यांनी अवैध ठरवला. यापूर्वी चार नगरसेवक अपात्र ठरले आहेत. जातीचा दाखल्याच्या या फटक्यामुळे महापालिकेतील सत्तासमीकरण बदलण्याच्या मार्गावर आहे. या सात प्रभागांमध्ये पुन्हा निवडणूक होणार आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर केली नसल्याने महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह  २० नगरसेवक अडचणीत आले होते.