08 March 2021

News Flash

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात आज बैठक

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीवरून संघर्षांचे फटके उडू लागल्याने महापालिकेने समन्वयाची भूमिका घेतली असून याबाबत सोमवारी एक महत्त्वपूर्ण बठकीचे आयोजन देवल क्लब येथे दुपारी ४ वाजता करण्यात

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीवरून संघर्षांचे फटके उडू लागल्याने महापालिकेने समन्वयाची भूमिका घेतली असून याबाबत सोमवारी एक महत्त्वपूर्ण बठकीचे आयोजन देवल क्लब येथे दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासून कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झाली नव्हती. २४ जुल १९८९ ला ४२ गावांच्या समावेशासह हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव राज्यशासनास सादर केला मात्र विरोधाने तो प्रस्ताव बारगळला. यानतंर तीन वेळा प्रस्ताव पाठवल्यानंतर तीनही वेळा तो प्रस्ताव बारगळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हद्दवाढीसाठी तोंडी आश्वासन दिल्याने २२ जून २०१५ ला पुन्हा २० गावांचा समावेश असलेला प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला. हद्दवाढीबाबतच्या प्रस्तावावर नगरविकास खात्याने जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांचा अभिप्राय मागविला होता. औद्योगिक क्षेत्र वगळून हद्दवाढ करण्याचा अभिप्राय सनी यांनी बुधवारी नगरविकास खात्याकडे पाठविला होता. यानंतर हद्दवाढी विरोधात आंदोलनाने जोर धरला होता. यामुळे हद्दवाढ कृती समितीच्या वतीने पुढील दिशा ठरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बठकीचे आयोजन केले असल्याचे महापालिकेच्या वतीने रविवारी पत्रकाद्वारे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2016 1:40 am

Web Title: meeting for increase border in kolhapur corporation
टॅग : Corporation,Meeting
Next Stories
1 ‘दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना दिल्लीतील सुलतानी संकट जबाबदार’
2 स्वीकृत नगरसेवक नावावरून कोल्हापूर महापालिकेत गोंधळ
3 घरफाळा वाढीचा प्रस्ताव कोल्हापुरात फेटाळला
Just Now!
X