22 September 2019

News Flash

केंद्राचे पथक आज कोल्हापुरात

महापुरात झालेल्या नुकसानीची पाहणी

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर, सांगलीच्या महापुरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी कोल्हापुरात येणार आहे. केंद्र सरकारचे हे पथक पाहणीनंतर अहवाल शासनाला देणार आहे.

ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यंच पावसाने धुमाकूळ घातला. त्यात अतोनात नुकसान झाले. त्यानंतर पूरग्रस्त भागांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे भरीव निधीची मागणी केली. त्यानंतर केंद्र सरकारने पथक राज्यात पाहणीसाठी पाठवले आहे.

राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यत आलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राची दोन पथके  राज्यात दाखल झाली आहेत. उद्या शिरोळ येथून पथके पाहणीला सुरुवात  करणार असून हातकणंगले, करवीर, कोल्हापूर शहराला भेटी देणार आहे. प्रत्येक ठिकाणी पाहणीसाठी १० ते १५ मिनिटांचा वेळ दिला असून त्यावरून नाराजी व्यक्त होत असून ही वेळ वाढवावी अशी मागणी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली आहे.

First Published on August 30, 2019 1:45 am

Web Title: monitoring of damage in kolhapur flood abn 97