News Flash

उदयनराजेंवर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात कोल्हापुरात निदर्शने

अॅड. गुणवंत सदावर्तेंविरोधातही घोषणाबाजी

संग्रहित छायाचित्र

खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरात गुरुवारी विविध संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

समाजात दुही पेरण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींच्या दोन्ही वारसांबद्दल वादग्रस्त विधान करून जाणीवपूर्वक अवमान केला आहे. तर सदावर्ते यांनी सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध चालवला आहे, असा आरोप करीत राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात दुहीचे राजकारण मुळीच चालणार नाही. येथील सामाजिक ऐक्याची नाळ भक्कम आहे, अशा भावना नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह इतरांनी व्यक्त केली.

दसरा चौकात सायंकाळी झालेल्या या आंदोलनात महापौर निलोफर आजरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे, विनायक फाळके, उमेश पोर्लेकर यांच्यासह मराठा समाजासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 8:02 pm

Web Title: protests against prakash ambedkar in kolhapur aau 85
Next Stories
1 विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे नवीन कुलगुरूंसमोर आव्हान
2 साखर उद्योगाच्या अडचणींमध्ये वाढ  
3 महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र सोहळ्याबाबत संदिग्धता
Just Now!
X