वगळता सर्व व्यवहार बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यतील वाढती करोना रुग्णसंख्या, मृत्युदराचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून कडक टाळेबंदी लागू झाली आहे. पुढील आठवडाभरासाठी ही टाळेबंदी लागू असणार आहे. औषध, दूध, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. टाळेबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना शनिवारी प्रशासनाने दिल्या.

जिल्ह्यत गेल्या महिनाभरात करोना रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण चिंता वाढीस लावणारे आहे. करोना साखळी तोडण्यासाठी कडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यतील लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर घेतला होता. त्यानुसार त्याची अंमलबजावणी शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे.

अत्यावश्यक वस्तू घरपोच

आगामी आठवडय़ात बँका, उद्योग, खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. भाजीपाला, दूध, गॅस ही सेवा घरपोच केली जाणार आहे. शेतीशी निगडित कामे, इंधन, वृत्तपत्र वितरण सुरू राहणार आहे. जिल्हा प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास आधी करोना चाचणी बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी सांगितले.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

शनिवारी महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये प्रशासक

डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरातील धोकादायक क्षेत्र

कमी होण्यासाठी अधिकाऱ्याने दैनंदिन फिरती करून टाळेबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना केली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या गाडय़ा जप्त केल्या जाणार आहेत, असे सांगितले.