इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेमध्ये ३ कोटी ५८ लाख  रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, त्यांची पत्नी कांचन पुजारी , शाखाधिकारी मलकारी लवटे यांच्यासह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कर्जविभाग प्रमुख राजेेंद्र गणपती जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक रावसाहेब महादेव जावळे,शाखाधिकारी राजेंद्र जयपाल मौर्य, वरिष्ठ अधिकारी सुरेखा जयपाल बडबडे, कनिष्ठ अधिकारी मारुती कोंडीबा अनुसे, शिपाई अभिजित मल्हारी सोलगे, रोखपाल वैभव बाळगोंडा गवळी, निलेश शिवाजी दळवी,रोहित बळवंत कवठेकर, सर्जेराव महादेव जगताप आयटी व्यवस्थापक शेखर नारायण खरात (रा. सांगलीवाडी),  शाखाधिकारी प्रभाकर बाजीराव कदम, शाखाधिकारी राहुल प्रकाश पाटील, शाखाधिकारी विकास वसंत साळुंखे, सारीका निलेश कडतारे, शिपाई विजय परशराम माळी यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> आरक्षणातील ५० टक्क्यांची अट निघत नाही तोवर गुंता कायम; जनतेला फसवू नका – अशोक चव्हाण

ias officer puja khedkar files harassment complaint
पूजा खेडकर यांना पोलिसांचे समन्स; छळ प्रकरणात पुण्यात येऊन जबाब नोंदविण्याचे आदेश
330 crores scam in municipal education department allegation by mumbai
महापालिकेच्या शिक्षण खात्यात ३३० कोटींचा घोटाळा; निविदा प्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे शैक्षणिक साहित्य विलंबाने, काँग्रेस पक्षाचा आरोप
remain vigilant during ashadi ekadashi at Pandharpur bombay hc tells solapur district collector
पंढरपूर घाट सुशोभीकरण प्रकरण : अनुचित घटना घडल्यास जिल्हाधिकारी व्यक्तिशः जबाबदार
nashik save committee chief meet deputy municipal commissioner over problems due to road work during rainy season
पावसाळ्यात रस्ते कामामुळे समस्या; नाशिक वाचवा समितीचे एकावेळी एकच काम करण्याचे आवाहन
Former Chief Executive of Phaltan municipal council, Chief Executive on Compulsory Leave, Land Grabbing Investigation, Phaltan news, satara news
फलटणच्या तत्कालीन मुख्याधिकार्‍यांसह चौघेजण सक्तीच्या रजेवर, विधिमंडळात चर्चेवेळी उदय सामंत यांचे आदेश
Solapur, ransom, Municipal Health Officer,
सोलापूर : महापालिका आरोग्याधिकाऱ्यास दोन कोटींची मागितली खंडणी; प्रहार संघटनेच्या नेत्यासह दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल
Notification to Municipal Corporation regarding preparation of Kumbh Mela nashik
कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महापालिकेला सूचना; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
government decision to develop flamingo habitat in navi mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगों अधिवास विकसित करण्याचा निर्णय; प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, वनमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

फिर्यादी धोंडीराम चौगुले हे शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आले आहेत. लेखापरीक्षणामध्ये वर नमुद संशयितांनी कर्जाची येणे बाकी असताना कपटाने बनावट निरंक दाखले देणे व ते खरे म्हणून वापरणे, कर्जाची बाकी असताना बेकायदेशीर उचल देणे, कर्जाला बेकायदेशीर सवलत देणे, अध्यक्ष व पत्नी यांना नियमबाह्य कर्ज देणे, संचालक मंडळाची मंजूरी न घेता कर्ज वाटप करणे आदीप्रकारे पदाचा दुरुपयोग करत एकूण ३ कोटी ५८ लाख हजाराचा अपहार व गैरव्यवहार संगनमताने केल्याचा ठपका ठेवला आहे. अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरीत सुरेखा बडबडे, सर्जेराव जगताप, राहुल पाटील, सारीका कडतारे आणि कांचन पुजारी यांचा शोध सुरु आहे.