लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शहरातील एका अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली. येथून १५ घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे ६० हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

Kolhapur deshi pistol marathi news
गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी कोल्हापुरात एकास अटक
Pune Maharashtra Heavy Rain Alert Today
Pune Heavy Rain : पुण्यात कोसळधारा, ३८ ठिकाणी झाडे कोसळली
Two gangsters and two accused in Rajura firing case arrested
दोन कुख्यात गँगस्टरला अटक, राजुरा गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी…
municipal corporation limit increase,
कोल्हापूर महापालिका हद्दवाढीस विरोध ; १९ गावांत कडकडीत बंद
rain, Mumbai, Pune, Sindhudurg,
मुंबई, पुण्यात आजही मुसळधार; सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्याला लाल इशारा
10 thousand kg plastic kolhapur,
कोल्हापूर: गांधीनगरात एकल प्लास्टिकचा सर्वात मोठा साठा जप्त 
Goregaon-Mulund Link Road, pm modi,
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प : पंतप्रधानांच्या हस्ते जुळ्या बोगद्याचे उद्या भूमिपूजन
bmc take control of 120 acre land at mahalaxmi race course
महालक्ष्मी रेसकोर्सवर अखेर पब्लिक पार्क; १२० एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात, भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी

जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या पथकाने ग्राहक कल्याण दक्षता फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत गुलाब गल्लीत कपिल मिठारी यांच्या घरी अचानक धाड टाकून तपासणी केली.

आणखी वाचा-इचलकरंजीत अस्वच्छतेचे साम्राज्य; आंदोलकांकडून अधिकारी धारेवर

यावेळी मिठारी यांच्या घराच्या आवारात दोन एलपीजी सिलेंडर, गॅस रिफ़िलींग नोझल, वजन काटा इत्यादी संशयास्पद साहित्य आढळले. तर आतील खोलीत सुमारे १५ घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर आढळली. पथकाने सर्व साहित्य जप्त केले असून जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.