कोल्हापूर : अल्पसंख्याकांच्या खासगी शाळांची तपासणी करून शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासा. अपात्र शिक्षक भरती झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी येथे दिला.

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाचा आढावा अध्यक्ष खान यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, यावेळी ते बोलत होते. जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित मोदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, शिक्षणाधिकारी (प्राथमिक.) मीना शेंडकर, उदय कांबळे उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसमावेशक शिक्षणावर भर

खान म्हणाले, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी देशातील प्रत्येक घटकाचा विकास साधला जात आहे. अल्पसंख्याक समाजात मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व इतर धर्मांचाही समावेश होतो. या समाजाच्या उन्नतीसाठी मुलामुलींसाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धती राबवण्यावर भर देण्यात येणार असून, तसे पत्र शासनाकडे पाठवण्यात आले आहे.