निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन कामाला

कोल्हापूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले

कोल्हापूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले असून, मंगळवारी ७ विभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिका-यांची नेमणूक करण्यात आली. त्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिकेतील उपअभियंते अशा वरिष्ठ अधिका-यांची अनुक्रमे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व द्वितीय सहायक निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कार्यभार हाती घेऊन कामकाज हाताळण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिका-यांची बठक होऊन ७ विभागीय कार्यालयामार्फत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता या विभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीचे आदेश मंगळवारी महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी व समकक्ष वर्ग-१ या वर्गातील अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सार्वत्रिक निवडणुकीची प्रकिया २८ सप्टेंबरपासून सुरू झाली असून १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कामी ८१ प्रभागांची ७ विभागीय कार्यालयानुसार विभागणी करण्यात आली आहे. त्याकरिता नियुक्त करण्यात आलेले अधिकारी याप्रमाणे- (कार्यालयाच्या ठिकाणानुसार निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व द्वितीय सहायक निवडणूक अधिकारी याप्रमाणे क्रम) – १. उलपे हॉल, कसबा बावडा, ई-वॉर्ड, प्रभाग क्रमांक १ – उपजिल्हाधिकारी संजय पवार, शिरोळ तहसीलदार सचिन गिरी, मलनिस्सारण उपअभियंता सुरेश कुलकर्णी. २. नागाळा पार्क हॉल, नागाळा पार्क, ई-वॉर्ड- उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अप्पर चिटणीस दिलीप सावंत, पाणीपुरवठा उपअभियंता एस. एस. कांबळे. ३. ताराराणी मार्केट, कावळा नाका, प्रभाग क्रमांक २३- उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पन्हाळा तहसीलदार आर.बी. चोचे, महापालिका अभियंता हर्षजित घाटगे.
४. जगदाळे हॉल, राजारामपुरी, प्रभाग क्रमांक ३६- उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार जयश्री आव्हाड, सहायक अभियंता एम. एम. पाटील. ५. दुधाळी पॅव्हेलियन, प्रभाग क्रमांक ५३- उपजिल्हाधिकारी शंकर भोसले, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, अभियंता एस. के. पाटील. ६. गांधी मदान पॅव्हेलियन, प्रभाग क्रमांक ४७- उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, शाहूवाडी तहसीलदार हृषीकेश शेळके, अभियंता एस. के. माने. ७. हॉकी स्टेडियम, प्रभाग क्रमांक ५९- अप्पर जिल्हाधिकारी शरद काटकर, गडिहग्लज तहसीलदार हणमंत पाटील, कनिष्ठ अभियंता हेमंत जाधव.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Administration began work for the election process

ताज्या बातम्या