कोल्हापूर : जनावरे चोरणारी एक टोळी पुरंदर पोलिसांनी आज पकडली. त्यांच्याकडून २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ मे रोजी कवठेगुलंद येथून जनावरे चोरीची घटना घडली होती.
या घटनेचा तपास करताना कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातील मंगसुळी येथून अनिल आप्पासाहेब भोसले ( वय वर्षे २२), किरण शंकर नाईक वय वर्षे २४, रोहित राजू भोसले वय वर्षे २० सर्व कोळी रस्ता मंगसुळी तालुका कागवाड ) या तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील २, कागवाड कर्नाटक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ तर मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशी चोरीची गुन्हे उघडकीस आली आहेत. त्यांना आज येथील न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यातील २२ पैकी एक वगळता सर्व खुनाचे गुन्हे उघडकीस – सुनील फुलारी
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील कवठे गुलंद येथे २४ मे रोजी दीपक अण्णासो पाटील यांच्या गोठ्यातून एक गाय व एक म्हैस अशी जनावरांची चोरी झाली होती. चोरीचा तपास करीत असताना कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातील मंगसुळी येथील तिघांना अटक करून त्यांच्याकडून पुण्यात चोरी केलेला मुद्देमाल व वापरण्यात आलेली गाडी असा एकूण २ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, अनिल चव्हाण, बाळासाहेब कोळी, सागर खाडे, शिरीष कांबळे, नागेश केरीपाळे, सचिन पुजारी, फारूक जमादार, अमर वासुदेव यांनी केली.