कोल्हापुरातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी गद्दारी केल्याने पक्ष प्रतोद नियाज खान याचे घर रात्री फोडण्याच्या प्रकाराचे पडसाद शुक्रवारी  शिवसेनेच्या भगिनी महोत्सवामध्ये उमटले. मुंबई बेस्टचे सभापती अरुण दुधवडकर यांनी शिवसनिकांनी केलेल्या प्रकारचे जाहीरपणे समर्थन केले. तर परिवहनमंत्री व शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी याबाबत दुधवडकर बोलतील असे म्हणत त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तर आमदार राजेश क्षीरसागर या प्रकरणी माध्यमांवर तोफ डागली.
वैशाली क्षीरसागर यांच्या भगिनी मंचच्या वतीने प्रायव्हेट हायस्कूलच्या भव्य पटांगणावर आजपासून ६ व्या भगिनी महोत्सवास सुरुवात झाली.  पाच महिलांसह १०० कर्तृत्ववान महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून रावते म्हणाले, तोंड भरून स्तुती आणि वेळ आल्यानंतर कृती असे आपल्या पक्षाचे ब्रीद आहे. भीषण वास्तव, दाहकता, महिलांची स्थिती पाहून वाईट वाटतं. पण यावर सत्तेत आल्यानंतर आपण काही करतो का? हा खरा प्रश्न आहे. कुठलंही पद पडीक नसतं. जर कचऱ्यातून विजनिर्मिती होत असेल तर कुठल्याही पदावर असलो तरी कुठलंही काम आपण करू शकतो, हा विचार बाळासाहेबांनी दिला आहे. आणि म्हणूनच कुठंलही चांगलं काम करा पक्ष तुमच्या पाठशी आहे, असा विश्वास त्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, नगरसेवक आणि कार्यर्त्यांना दिला.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, महिलांना निर्णय स्वातंत्र्य मिळून त्यांची अíथक उन्नती होणार नाही, तोपर्यंत महिला सक्षमीकरणाला अर्थच उरणार नाही. शिवसेनेसाठी मोठय़ा निष्ठेने मी १५ वष्रे काम करत आहे. सध्याचे राजकारण चुकीच्या दिशेने जात आहे. यामुळे जो कोणीही शिवसेनेशी गद्दारी करेल त्याला सोडणार नाही, अशा कडक शद्बात नियाज खान प्रकरणी आपल्यावर झालेल्या टीकेला उत्तर देता आमदार राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांना जबाबदार धरले.
कोल्हापुरातही धावणार अबोली रिक्षा
रिक्षा परमिट देताना महिलांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून त्यासाठी अबोली रंगाची रिक्षा आहे. ठाण्यात महिलांच्या अबोली रिक्षा धावतात. कोल्हापुरातही अबोली रिक्षा सुरू करण्यात येतील. त्याची जबाबदारी भगिनी मंचने घ्यावी, असे रावते म्हणाले.
नियाज खान यांना लक्ष्य
कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडीवरून पक्षाशी गद्दारी केल्या प्रकरणी शिवसेना गटनेते नियाज खान हे चांगलेच अडचणीत आले आहेत. गुरुवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी खान यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांचा घरी जाऊन केली. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी सेनेच्या चारही नगरसेवकांना शिवसेनेशी गद्दारी केल्यास याद राखा, असा दम भरला.  शुक्रवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते शहरात येणार असल्याने क्षीरसागर व पवार यांच्यासह शिवसनिक अस्वस्थ आहेत. खान यांच्यासह अन्य तिघांनी गरसमजातून प्रकार घडला असल्याचे सांगितले असले, तरी शिवसनिक त्यांच्यावर चिडून आहेत. गुरुवारी सायंकाळी शिवसनिक खान यांना काळे फासण्याच्या तयारीने हुतात्मा पार्क येथे जमल्याने तणाव निर्माण झाला होता.