ऊस दर आंदोलक आणि साखर कारखानदार समर्थक हे रविवारी परस्परांना भिडल्याने शिरोळ तालुक्यातील ऊस आंदोलन चिघळले. आंदोलन अंकुश संघटनेने दोघा कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करीत उद्या कोल्हापूर सांगली मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>>कोल्हापुरात उसाला चांगला दर ; राज्यात अन्यत्र शेतकऱ्यांना ६०० ते ७०० रुपये कमी भाव

उसाचे मागील हिशोब द्यावा तसेच चालू हंगामासाठी ३१०० रुपये दर जाहीर करावा यासाठी शिरोळ तालुक्यात आंदोलन अंकुश संघटनेने आंदोलन सुरु केला आहे. तालुक्यातील महत्त्वाचा कारखाना समजला जाणारा दत्त साखर कारखाना आज गळीत हंगाम शुभारंभ करून २९५० रुपये दर अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी जाहीर केला आहे.

हेही वाचा >>>निकृष्ट रस्ते काम कोल्हापुरात बंद पाडले

आंदोलन अंकुशने दत्तच्या या ऊसदराच्या निर्णय अमान्य करीत शिरटी फाट्यावर तंबू मारून ऊस वाहतूक रोखली होती. ऊस अडविणेची तीव्रता वाढली असल्याने याला कारखाना समर्थक शेतकरी विरोध दर्शवत शिरटी फाट्यावर जमले. ऊस ट्रॅक्टर आला की अंकुशचे कार्यकर्ते अडवत आणि कारखाना समर्थक तो बाजूला करून कारखान्याकडे पाठवत असा खेळ सुरू होता. संघटनेने रस्त्यावर ठिय्या मारला असतावाद वाढला. त्याचे पर्यवसान दोन्ही गटात हाणामारीत झाले.

समर्थक, माजी आमदारांचा निषेध
यामध्ये संघटना तालुका प्रमुख दीपक पाटील यांना चांगलाच मार बसला. दोघे जखमी झाल्याने संघटनेने साखर कारखानदार समर्थकांचा निषेध केला. तर आंदोलन सुरु असताना शेतकरी संघटनेचे नेते, शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील हे तेथे न थांबल्याने त्यांचाही निषेध करण्यात आला.