लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : मराठा समाजाला टिकाणारे व शाश्वत आरक्षण दिल्याचा उल्लेख करीत शनिवारी येथे भाजपाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मराठा समाजाने मागणी केलेल्या सर्व मागण्या या शासन आदेशाद्वारे पूर्ण झाल्याने आज महाद्वार चौक येथे साखर पेढे वाटण्यात आले. आरक्षण देणाऱ्या महायुती सरकारचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये,सरचिटणीस गायत्री राऊत, जिल्हा चिटणीस संगीता खाडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे यांची भाषणे झाली.

आणखी वाचा-आदिवासी विद्यार्थी चाखणार ‘वारणे’च्या टेट्रापॅकमधील आरोग्यवर्धक सुगंधी दूध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने शब्द पाळला

दरम्यान, महायुती शासनाने शब्द पाळला. मराठा समाजाला न्याय दिला. आरक्षणाबद्दल ऐतिहासिक निर्णय घेऊन या सरकारने आपली विश्वासार्हता आणि जनसामान्यांबद्दलची आस्था सिद्ध केली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.