कोल्हापूर : सोशल मीडियावर पोस्ट करीत भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज पुलाची शिरोली (तालुका हातकणंगले) येथे आज घडला. सानिका नानासाहेब निकम (वय १६) आणि अरबाज शब्बीर पकाले (वय १८, रेणुका नगर शिरोली पुलाची) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सानिया- अरबाज या अल्पवयीन युवतींचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र या प्रेमाला दोन्ही कडील कुटुंबीयांचा विरोध होता. हे प्रेमाचे नव्हे;शिक्षणाचे वय आहे, अशी त्यांची समजूत घातली जात होती. मात्र तरीही हे प्रेमीयुगल आपल्या मतावर ठाम होते. कुटुंबियांच्या विरोधाला त्यांनी दाद दिली नव्हती. यातूनच त्यांनी जीवन संपवण्याचा धाडसी पण दुर्दैवी निर्णय घेतला होता.

आणखी वाचा-दुध अचूकतेचे तोलन उपकरण वापरण्याकडे दुर्लक्ष; कोल्हापूर जिल्ह्यातील ७० केंद्रांवर कारवाई

इंस्टाग्राम वर काय म्हटले होते?

या दोघांनी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ‘ ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यासोबत मरायला पण तयार राहा, नाहीतर प्रेम करू नका. जात धर्म बघून प्रेम करू नका, सगळीच तशी नसतात,’ असे म्हणत फोटो शेअर केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटना कशी घडली?

काल रात्री सानिया घरातून पळून गेली. तिचा शोध नातेवाईकांनी घेतला होता. मात्र ती आढळली नव्हती. घरातून निघाल्यानंतर ती अरबाजच्या घरी पोहचली. तेथे दोघांनी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.