कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीतच राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कामातील नियोजनाचा अभाव, अधिकाऱ्यांची बेपर्वाई यावरून नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने बैठक लक्षवेधी ठरली.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी समन्वय केलेल्या बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, संजय मंडलिक, धैर्यशील माने आदी खासदार तसेच मार्नंसग नाईक, अरुण लाड हे आमदार सहभागी झाले होते.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे साडे तीन हजार कोटीच्या खर्चाचे सहापदरी करणाचे काम प्रस्तावित आहे. या कामाचे अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. सूचना केल्या तरी ते दुर्लक्ष करतात, प्रश्नकत्र्याकडे बेपर्वाईने बघतात, असा प्रश्नांचा भडिमार येथे आयोजित बैठकीत करण्यात आला. हे काम होणार तरी कधी, महापुराने पुलांच्या सदोष बांधणीचे परिणाम निदर्शनास येऊनही राष्ट्रीय महामार्ग विभाग अजूनही जागा होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
मंत्रीही संतप्त : नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार केल्यावर त्या मंत्र्यांनीही सुरात सूर मिसळला. कागल येथील बोगदा रुंदीकरणाच्या कामाबाबत वारंवार सूचना करूनही गैरसोयी कायम आहेत. मंत्र्यांच्या कामाची दखल घेत नाहीत तर जनतेची दखल कशी घेतली जाणार,असा आक्रमक सूर लावल्यावर अधिकाऱ्यांनी सूचनांची कृती केली जाईल, असे आश्वासन दिले. राष्ट्रीय महामार्ग प्रमाणेच नागपूर- रत्नागिरी या महामार्गाच्या कामातील लोकांच्या तक्रारीचा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लावून धरल्यावर दिवाळीत या विषयाची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
महापुरावर उपाय योजना
कोल्हापूर शहराला महापुराचा तीन वर्षात दोनदा मोठा फटका बसला. त्यावर पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी भराव टाकून कमानी कराव्यात, रस्त्याची उंची वाढवावी अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगितले. सहा पदरी कामाचे समन्वयक वसंत पंदरकर यांनी सादरीकरण केले.