कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीरचे आमदार पी. एन. पाटील हे उपचारासाठी अस्ट्रर आधार हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे समजतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपले स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांना तातडीने कोल्हापूरला पाठवून दिले. हवी ती सर्व वैद्यकीय मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार मंगेश चिवटे यांनी आज या हॉस्पिटलला भेट देऊन आमदार पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. उल्हास दामले आणि डॉ. अजय केणी या डॉक्टरांची भेट घेतली.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आमदार पाटील यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करून योग्य ते सर्वोत्तम उपचार तात्काळ करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

आणखी वाचा-आमदार पी. एन. पाटील यांना अधिकच्या उपचारांसाठी मुंबईला हलविता येईल काय?; हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांशी दूरध्वनीवरून चर्चा

तसेच, आमदार पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना धीर देऊन त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना एयर ॲम्बुलन्सने मुंबईला आणून पुढील अद्ययावत उपचार पुरवण्याबाबत आश्वस्त केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल पाटील यांस काळजी करू नका, परमेश्वर कृपेने सर्व ठीक होईल असा धीर दिला. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा कक्ष प्रमुख प्रशांत साळुंखे उपस्थित होते.