सांगली, कोल्हापूरमधील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील सभेत केला. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आज कोल्हापूर येथे महिला मेळावा आणि अन्य उपक्रमांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तेव्हा त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. कोल्हापूरमधील पुराबाबत विविध उपाययोजना केल्याचे सांगत असताना त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. मुंबईत २६ जुलै २००५ साली भीषण पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्याची आठवण करून देत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी निशाणा साधला.

गॅस दरकपातीला जुमला म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजपाचे उत्तर; बावनकुळे म्हणाले, “शेतीतून ११३ कोटींचे उत्पादन घेणाऱ्यांना…”

२६ जुलैच्या पुरात वडिलांना सोडून पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेले

मुंबईमधील पूरपरिस्थितीची आठवण करून देत असताना ते म्हणाले, “माणुसकी, प्रेम म्हणजे काय असतं, हे कोल्हापूरकरांकडून शिकावं. मागे एकदा कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना मी बोटीने एका गावात गेलो होते. तिथे घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलेले दिसले. त्या घरातील कुटुंबाने दुसऱ्या मजल्यावर कुटुंबीयांसह गुरा-ढोरांनाही स्वतःबरोबर ठेवलं होतं. हे प्रेम कुठं आणि २६ जुलैच्या मुंबईतील पुरात आपल्या वडिलांना घरातच सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणारे लोक कुठे? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

वडील चोरल्याच्या टीकेला प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीनिमित्त उद्धव ठाकरे सध्या कुटुंब संवाद दौऱ्यावर आहेत. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात त्यांच्या सभा झाल्या. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. माझा पक्ष चोरला, माझे वडील चोरले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तुम्हाला तुमचे वडील नाहीत का? तुमच्या वडिलांचे काम सांगण्यासारखे नाही का? असा सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचे सांगितले जाते.

“संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी…”, नितीन गडकरींच्या विधानाबाबत भाजपाची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूरातील पुराची समस्या कायमची संपावी, इचलकरंजीकरांना पुराचा त्रास होऊ नये, यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३२०० कोटींचा प्रकल्प आपण करत आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पातून कायमस्वरुपी हा त्रास दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पंचगंगा प्रदूषणाची समस्या मिटवण्यासाठी ७५० कोटींची योजना आखली आहे. कोल्हापूर खंडपीठाबद्दलही महाधिवक्ता आणि मुख्य न्यायाधीशांशी चर्चा करून तोही प्रश्न लवकर सोडविला जाईल. तसेच शेतकऱ्यांना २०० पट पाणीपट्टी लावली आहे. ती कोल्हापूरच्या या सभेतूनच मी रद्द करत आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.