कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आम्ही सगळे तरुण आमदार वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून एकसंघपणे काँग्रेसचा झेंडा पुढे घेवून जाऊ, जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ आहे, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे इतर आमदार फुटणार यात तथ्य नसल्याचे देखील बोलून दाखवले.

अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात चर्चांना ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते, आज सकाळपासून मी स्वतः काँग्रेसच्या २० ते २२ आमदारांशी फोनवरून संपर्क साधला. शिवाय, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले ही काँग्रेसची ज्येष्ठ नेते मंडळी देखील सर्व आमदारांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचा कोणताही आमदार फुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेसचा आणखी एक गट फुटून जाणार यात फारस काही तथ्य नाही.

हेही वाचा – ‘आहुती’साठी रेडे, बोकड पळवल्याने अदृश्य आणि महाशक्ती विरोधात आमचा शिमगा सुरू; साहित्यिकांचा परखड सूर

सगळे सर्व्हे पाहिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. महायुतीबद्दल जनतेत नाराजी आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण बिघडवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय का ? अशी शंका सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – राज्याचे मुद्रांक शुल्क उत्पन्न ५० हजार कोटीवरून ७५ हजार कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट – राजगोपाल देवरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही एकत्र राहिलो तर महाविकास आघाडीला भविष्यात मोठ यश मिळणार आहे. दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते समर्थपणे काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाणार आहोत. राज्यातील पक्षफुटीच्या घटना घडल्यानंतर कोणत्याच निवडणुका झालेल्या नाहीत. आगामी निवडणुकीत जनता आपल्या बाजूने कौल देईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.