कोल्हापूर : दिवाळी तोंडावर आली असताना कोल्हापुरात बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढत चालली आहे. वस्तू व सेवा विक्री करात (जीएसटी) कपात झाल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. ग्राहकांकडून स्वदेशीचा नारा देत खरेदी केली जात आहे.

दिवाळीच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. नानाविध प्रकारच्या वस्तूंची खरेदीची लगबग शहरातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादाने व्यापारी वर्ग आनंदित झालेला दिसत आहे. लक्ष्मीपूजन, दीपावली पाडव्याला मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे संकेत दिले जात आहेत.

सहकुटुंब खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरासह बाजारपेठांमधील साहित्यांची आवक-जावक वाढू लागली आहे. महाद्वार रोड, लक्ष्मीपूरी, शाहूपुरी, राजारामपुरी, गांधीनगर परिसरातील बाजारपेठा फराळापासून ते फटाक्यांपर्यंत सज्ज झाल्या आहेत. साड्या, पंजाबी ड्रेस, कुर्तीज, शर्ट, पॅंट आदी प्रकारचे कपडे, रांगोळीचे रंग, आदी गोष्टींची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात एकच गर्दी उसळली आहे. याबरोबरच टीव्ही, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आगावू नोंदणी ग्राहक करत आहेत. पापाची तिकटी, पानलाइन परिसर आकाश कंदिलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.

तयार फराळ, पूजेचे साहित्य, फटाके, पणत्या, सुगंधी तेले, साबण, उठणे, पादत्राणे खरेदीत मोठी उलाढाल झाली. ब्रँडेड कंपन्यांच्या कपडे खरेदीवर तरुणाईचा अधिक भर होता. ग्राहकांकडून स्वदेशी वस्तूंची मागणी अधिक प्रमाणात केली जात आहे. दिवाळी तोंडावर आली असताना कोल्हापुरात बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढत चालली आहे. वस्तू व सेवा विक्री करात (जीएसटी) कपात झाल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

ग्राहकांकडून स्वदेशीचा नारा देत खरेदी केली जात आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. नानाविध प्रकारच्या वस्तूंची खरेदीची लगबग शहरातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादाने व्यापारी वर्ग आनंदित झालेला दिसत आहे. लक्ष्मीपूजन, दीपावली पाडव्याला मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे संकेत दिले जात आहेत.

सध्या बाजारात फराळापासून ते फटाक्यांपर्यंत सज्ज झाल्या आहेत. साड्या, पंजाबी ड्रेस, कुर्तीज, शर्ट, पॅंट आदी प्रकारचे कपडे, रांगोळीचे रंग, आदी गोष्टींची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात एकच गर्दी उसळली आहे. याबरोबरच टीव्ही, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आगावू नोंदणी ग्राहक करत आहेत. पापाची तिकटी, पानलाइन परिसर आकाश कंदिलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. सहकुटुंब खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरासह बाजारपेठांमधील साहित्यांची आवक-जावक वाढू लागली आहे.