कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे.  कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा करून सोयीस्कर वेळेत दैनंदिन विमानसेवा सुरू करण्यात यश मिळवले आहे. १ ऑक्टोबर पासून कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू होत आहे.  व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूर: नूतन बँकेत साडेतीन कोटींचा अपहार, अध्यक्ष प्रकाश पुजारीसह १४ अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानसेवेचे वेळापत्रक रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान झेप घेईल आणि सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर उतरेल.  त्यामुळे दिवसभरातील मुंबईतील कार्यालयीन कामे करणे सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे.