scorecardresearch

“अमित शाह पहिल्या क्रमांकाचे शत्रू” म्हणणाऱ्या ठाकरे गटाला देवेंद्र फडणीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्ही त्यांना…”

अमित शाह हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे एक नंबरचे शत्रू आहेत, अशी टीका आज ठाकरे गटाने केली होती.

devendra fadnavis replied to thackeray group
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

अमित शाह हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे एक नंबरचे शत्रू आहेत, अशी टीका आज ठाकरे गटाने ‘सामाना’च्या अग्रलेखातून केली होती. या टीकेला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाला किती जागा मिळणार याबाबतही भाष्य केलं.

हेही वाचा – “अमित शहा हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू ” ठाकरे गटाचे टीकास्र!

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

यासंदर्भात बोलताना, “शत्रूच्याबाबतीत कोणाचा कितवा क्रमांक हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. आम्ही कधीही कोणाला शत्रू मानलं नाही. आम्ही त्यांना वैचारीक विरोधक मानतो. त्यांना शत्रू मानायचं असेल तर मानावं”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

दरम्यान, काल कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना, महाराष्ट्रातील जागा मोदींच्या पारड्यात टाका असं विधानं केलं होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे गटाला किती जागा मिळणार याबाबत फडणवीसांना विचारलं असता, “कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठीच काल शिवसेनेचे खासदारही आमच्या व्यासपीठावर होते. अमित शाहांनी काल बोलताना स्पष्टपणे एनडीए असा उल्लेख केला. त्यामुळे माध्यमांशी संभ्रम निर्माण करू नये. निवडणुकीसाठी आमचा फॉर्मुला ठरला आहे. तो योग्य वेळी आम्ही जाहीर करू. शिवसेनेला योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानामुळं संजय राऊत अडचणीत; नाशिकमध्ये गुन्हा दाखल

ठाकरे गटाने नेमकं काय टीका केली?

शिवजयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले, ते याच अमित शाहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिलेले नाही? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे शाहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल.” अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 10:50 IST
ताज्या बातम्या