कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि संचालक मंडळांचा विदेश दौरा गाजत आहे. यावरून आरोप प्रत्यारोपाची राळ उठली असली तरी हे संचालक मंडळ आज थेट इटली येथील राजाराम महाराज दुसरे यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक झाले. इटलीतील फ्लोरेन्स शहरातील आर्ना  व मुग्नोनो नद्यांच्या संगमावर कॅस्कीन पार्क या गार्डनमध्ये ही समाधी आहे. इटली आणि स्पेन या देशांच्या परदेश दौऱ्याच्या सहलीवर गेलेले तेथे पालकमंत्री, बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक पोहचले होते, असे बुधवारी सांगण्यात आले.

हेही वाचा >>> अश्विनी कोष्टा, अनिष अवधियाच्या मृत्यूस कारणीभूत मद्यधुंद वाहन चालक, वडिलांवर कठोर कारवाई करावी ; महाराष्ट्र कोष्टी समाजाची मागणी

उपाध्यक्ष आमदार राजूआवळे,  खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने , , ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक. तसेच;  गोकुळचे संचालक युवराज पाटील व बँकेचे माजी संचालक असिफ फरास उपस्थित होते. यावेळी मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आजोबा असलेले छत्रपती राजाराम महाराज हे आपल्या संस्थानातील जनतेसाठी परदेशातील आधुनिक व लोकोपयोगी व्यवस्था राबवण्यासाठी आग्रही होते. हे शिकण्यासाठी ते परदेश दौऱ्यावर आले होते. वातावरणातील बदलामुळे १८७१ साली वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या समाधी दर्शनाने धन्य झालो.