लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदानप्रकरणी पोलिसांनी आणखी एका डॉक्टरला बुधवारी अटक केली. डॉ. युवराज निकम ( रा. गगनबावडा ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आजपर्यंत सात जणांना जेरबंद करण्यात आले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्कमधील एका घरात अवैध गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याची माहिती मिळाल्याने आरोग्य विभाग आणि पोलिसांनी १६ जानेवारी रोजी छापा टाकला होता. या प्रकरणी बोगस डॉ. स्वप्नील केरबा पाटील, टेक्निशियन अमित केरबा डोंगरे,एजंट कृष्णात आनंदा जासूद, प्रदीप बाजीराव कोळी, पंकज नारायण बारटक्के, निखिल रघुनाथ पाटील या सहा जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर : अयोध्या एक्सप्रेसचे सारथ्य करण्याचा मान लोको पायलट गणेश सोनवणे यांना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील मुख्य सूत्रधार बोगस डॉ. स्वप्नील केरबा पाटील याचा यापूर्वी मुरगुड आणि राधानगरी येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात करवीर पोलीसांनी आज मुळचा म्हालसवडे ( ता. करवीर ) येथील आणि सध्या वैभववाडी येथे रुग्णालय चालवणारा डॉ. युवराज विलास निकम याला अटक केली आहे. त्याने वैभववाडीसह कोकण परिसरातील महिला गर्भलिंग निदानासाठी पाठवल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.