महावितरणकडून केल्या जाणाऱ्या २७ टक्के वीज दरवाढीच्या प्रस्तावाची येथील उद्योजकांनी होळी केली. सध्याचे वीज दर किमान दोन वष्रे स्थिर ठेवावेत, यासह अन्य मागण्यांसाठी उद्योजकांनी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करीत या दरवाढीचा निषेध नोंदवला. उद्योजकांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता शंकर िशदे यांना तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बग्रे यांना निवेदन दिले.

कोल्हापूर इंजिनिअिरग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रिज, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौन्ड्रीमेन या संघटनांनी या आंदोलनात भाग घेतला.

आंदोलनात वीज तज्ज्ञ  प्रताप होगाडे, चंद्रकांत जाधव, संजय अंगडी, राजू पाटील, जे. आर. मोटवानी, आनंद माने,  प्रल्हाद जोशी, उदय दुधाने, शाम तोतला, रामराजे बादल, मोहन कुशिरे, संग्राम पाटील, मल्हार भांदुग्रे, सुनील बत्तासे, समीर पाटील, सत्यजित पाटील यांचा सहभाग होता.

महावितरणने जून २०१५ला निश्चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेत २५ ते ४० टक्क्यांनी जास्त आहेत.

घरगुती, व्यापारी व शेतकरी ग्राहकांचे वीजदरही देशातील सर्वाधिक वीजदर पातळीच्या जवळपास पोहोचले आहेत. यामध्ये पुन्हा सरासरी १९ टक्के व चौथ्या वर्षी २७ टक्के दरवाढ लादणारा व चार वर्षांत ग्राहकांवर ५६.३७२ कोटी रुपयांची दरवाढ लादणारा प्रस्ताव महावितरण कंपनीने आयोगासमोर दाखल केला आहे.

ही संपूर्ण दरवाढ रद्द करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच, राज्यातील औद्योगिक ग्राहक, यंत्रमाग ग्राहक, घरगुती ग्राहक, छोटे व्यापारी, शेतकरी आदींचा वीजदर स्थिर ठेवण्याबाबत विविध दहा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

 

इचलकरंजीत निदर्शने

कोल्हापूर – राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या २.२५ कोटी वीज ग्राहकांवर चार वर्षांमध्ये ५६,३७२ कोटी रुपयांची दरवाढ लादणारा प्रस्ताव मागे घेऊन ही दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी इचलकरंजी येथे सर्वपक्षीय संघटना आणि यंत्रमागधारक, शेतकरी, घरगुती वीज ग्राहकांच्या वतीने महावितरण कंपनीच्या प्रवेशद्वारात दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करण्यात आली. या वेळी दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.  महावितरणने वीज नियामक आयोगासमोर वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामुळे आगामी तीन वर्षांत सरासरी १९ टक्के व चौथ्या वर्षी २७ टक्के दरवाढ होणार आहे. त्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आणि दरवाढीच्या संभाव्य परिणामांची जाणीव वीज ग्राहकांना करून देण्याकरिता विभागीय वीज ग्राहक परिषदा आयोजित करून या दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, यंत्रमागधारक जागृती संघटना, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, लक्ष्मी इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, सायिझग को-ऑप. सोसायटी, शिवउद्योजक सहकार सेना व उत्कर्ष उद्योजक संघटना, पिडीक्सेल, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन, रेंदाळ यंत्रमागधारक संघटना आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. महावितरणच्या प्रवेशद्वारात दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करत दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करण्यात आली.  सध्याचे वीज दर किमान दोन वष्रे स्थिर ठेवावेत, राज्याच्या विकासासाठी मारक ठरणारी संपूर्ण दरवाढ रद्द करावी याचबरोबर अन्य राज्यांच्या तुलनेत दर समपातळीवर आणावेत अशी मागणी करण्यात आली. निवेदनाची प्रत महावितरणचे कार्यकारी अभियंता िशदे, प्रांताधिकारी, अश्विनी जिरंगे यांना देण्यात आली. आंदोलनात सतीश कोष्टी, विश्वनाथ मेटे, विश्वनाथ अग्रवाल, विनय महाजन, दीपक राशिनकर, वसंत पाटील, जावीद मोमीन आदींसह यंत्रमागधारक, शेतकरी, घरगुती वीजग्राहक सहभागी झाले होते.