कोल्हापूर : उदगांव (ता.शिरोळ) येथील माळावरील श्री उदयसिध्द बिरोबा मंदिराच्या समोर असलेल्या ऊसतोड मजूराच्या झोपड्यांना मंगळवारी रात्री आग लागली. या भीषण आगीत पाच झोपड्या बेचिराख झाल्या. त्यातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यात एक शेळी भाजुन जखमी झाली आहे. इतर जनावरे व ट्रॅक्टर बाजुला केल्याने अन्य नुकसान टळले.जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली.

हेही वाचा >>> फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना

शिरोळ तालुकयातील ऊसाचा हंगाम अजुन दोन दिवस चालणार आहे. त्यामुळे ऊसतोड मजूर आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी रात्री महिला जेवण करीत असताना एका झोपडीला आग लागली. वारा सुटल्याने एका झोपडीला लागलेली आग दुसर्‍या झोपडीला त्यानंतर अन्य तीन झोपड्याना लागली.

हेही वाचा >>> कोल्हापूरसह राज्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रंगपंचमी; खरेदीला उधाण

  आग लागल्यानंतर ऊसतोड मजूरांनी जनावरे व लगत असलेले टॅ्रक्टर व अन्य वाहने बाजुला केली. यावेळी झोपड्यांमध्ये असलेल्या गॅस टाकीला मोठी आग लागल्याने l टाकीतून आगीचे लोट जात होते. घटनास्थळी परीसरातील नागरीकांनी धाव घेवून पाण्याचा मारा सुरू केला. जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमक दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमक दलाने आग आटोक्यात आली. यात पाच झोपड्यामधील अन्न, धान्य, कपडे , सर्व प्रापंचिक साहित्य जळून झाले. एक शेळी या आगीत भाजली गेली आहे. सर्व साहित्य एका क्षणात जळून खाक झाल्याने ऊसतोड महिलांना अश्रु अनांवर झाले होते. त्यामुळे पाच कुटुंबातील ऊसतोड मजूराचे संसार उघड्यावर पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.