कोल्हापूर : ट्रक मधील लाकडाची तपासणी न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यात वनपाल व वनरक्षक यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले. रॉकी केतन देसा (पद – वनपाल नेमणूक, प्रभारी परिमंडळ वनाधिकारी कार्यालय,हातकणंगले) व मोहन आत्माराम देसाई (पद -वनरक्षक. नेमणूक – हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा >>> क्रिप्टो करन्सीमधून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ३७ लाखाची फसवणूक

तक्रारदार यांचा जळाऊ लाकडांचा खरेदी विक्रीचा व्यापार आहे. तक्रारदार हे जत (सांगली),सांगोला (सोलापूर) येथून जळावू लाकूड खरेदी करून ते भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी येथे विक्रीसाठी आणतात.

यावेळी गाड्या मधील लाकडाची तपासणी न करण्यासाठी तसेच त्या वाहनातील जळावू लाकडांच्या वाहतूक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्या गाड्यावर कोणतीही कारवाई न करणेसाठी वनपाल देसा यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच त्याने ही रक्कम वनरक्षक देसाई याचेकडे देण्यास सांगितले होते.

हेही वाचा >>> पाण्याचा तिढा वाढला; इचलकरंजी नंतर कुरुंदवाडलाही दुधगंगेतून पाणी देण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानुसार आज सापळा रचला असता म्हणून रक्षक देसाई यांनी २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. आरोपीतांच्या विरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे,असे सापळा पथक प्रमुख सरदार नाळे यांनी सांगितले.