लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतले. त्याप्रमाणे चित्रपटाची मोठी परंपरा असणारा, ऐतिहासिक ‘जयप्रभा’ स्टुडिओही विकत घ्यावा. यासंदर्भात कृती समितीच्या वतीने आराखडा तयार करून पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांकडे तशी मागणी करण्याचा निर्णय जयप्रभा बचाव कृती समितीच्या बठकीत घेण्यात आला. कोल्हापुरातील अनेक जुन्या आठवणींच्या लतादीदी साक्षीदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांची मदत घेऊन मंत्रालयात लता मंगेशकर यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही या बठकीत घेण्यात आला.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बठकीत आता टोलनंतर ‘जयप्रभा’ स्टुडिओ वाचवण्यासाठी रान उठवण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी भाजपचे रामभाऊ चव्हाण होते. या वेळी बाबा पार्टे, निवास साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची असणारी ही जागा शेतकऱ्यांची आहे. जयप्रभा गेला तर ही ऐतिहासिक जमीनही नेस्तनाबूत होणार आहे. हेरिटेजची जमीन विकायचा अधिकार शासनाला नाही. यासाठीच कृती समितीच्या वतीने एक वस्तुनिष्ठ अहवाल करून तो शासनाला सादर करावा. या अहवालाच्या माध्यमातून सरकारने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी या वेळी केली.
या वेळी चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यवाह सुभाष भुर्के, उपाध्यक्ष मििलद अष्टेकर, नाटय़ परिषदेचे प्रफुल्ल महाजन, देवल क्लबचे श्रीक्रांत डिग्रजकर, सुनीलकुमार सरनाईक, पंडित सडोलीकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांच्यासह अनेक पक्षाचे कार्यकत्रे उपस्थित होते.
बैठकीत झडला पक्षीय संघर्ष
जयप्रभासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने चळवळ उभारण्यात येईल. प्रसंगी पसाही खर्च केला जाईल, असे सांगतानाच भाजपच्या रामभाऊ चव्हाण यांनी जे तुमच्या हातून झाले नाही ते आम्ही करून दाखवणार, असा टोला राष्ट्रवादीच्या आर. के. पोवार यांना लगावला. त्यामुळे पहिल्याच ‘सर्वपक्षीय’ बठकीत पक्षीय संघर्षांची ठिणगी पडली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2016 रोजी प्रकाशित
जयप्रभा स्टुडिओही सरकारने विकत घ्यावा
सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी करण्याचा कृती समितीचा निर्णय
Written by लोकसत्ता टीम
First published on: 15-01-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government should buy jayaprabha studio