इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी केलेल्या कारवाईत वाहनासह ४ लाख ५८ हजार रुपयांचा विनापरवाना तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी श्रीशैल सदाशिव वाळवेकर (वय २२, रा. खंजिरे मळा) याला ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास गावभाग पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना जिल्हा सत्र न्यायालयासमोर श्रीशैल वाळवेकर हा छोटा हत्ती वाहनातून जात असताना संशय आल्याने थांबविण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करता गाडीमध्ये स्टार पानमसाला, आरएमडी पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2016 रोजी प्रकाशित
साडेचार लाखांचा गुटखा कोल्हापुरात जप्त
या प्रकरणी श्रीशैल सदाशिव वाळवेकर (वय २२, रा. खंजिरे मळा) याला ताब्यात घेतले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-07-2016 at 02:36 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gutkha worth rs 4 lakh seized in kolhapur district