इचलकरंजीत येथील ऊसतोड मजूर महिला संगीता गायकवाड हिच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आराेपी तिचा पती रंगनाथ निवृत्ती गायकवाड (वय ३०, रा. खालापुरी, जि. जालना) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बुधवार, २ मार्च रोजी जुना चंदूर रोड परिसरातील पाटील मळ्यात संगीता गायकवाड हिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत फिर्यादी मुकादम रामनाथ बरडे याला अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून संगीताचा पती रंगनाथ याने खून केल्याचे सांगितले होते. त्या वेळी मुकादम बरडे हाही सोबत होता. बरडे याला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केली. तर या प्रकरणातील फरार असलेला पती रंगनाथ याला आज शिवाजीनगर पोलिसांनी खालापुरी येथून अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2016 रोजी प्रकाशित
ऊसतोड मजूर महिला खूनप्रकरणी पतीस अटक
अनैतिक संबंधाचा संशय
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-03-2016 at 03:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband arrested in sugarcane woman worker murder case