कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Corporation महानगरपालिका असा दर्जावाढ होवून वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच इचलकरंजी महानगरपालिका विकासकांमध्ये राज्यात अव्वल ठरली आहे. द्वितीय क्रमांक फेब्रुवारी २००२ मध्ये स्थापन झालेल्या मिरा भाईदर तर तृतिय क्रमांक ५० वर्षांचा इतिहास असलेल्या कोल्हापुर महानगरपालिकेस प्राप्त झाला आहे.

राज्य शासनाने केलेल्या मूल्यांकनामध्ये इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने विविध योजनांत उपक्रमशीलता, नाविन्य व गती राखल्याने राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार २० एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे एका समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान केला. महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, जलअभियंता सुभाष देशपांडे व अभियंता अभय शिरोलीकर उपस्थित होते.

हेही वाचा >>> कोल्हापूर: लाच स्वीकारणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक जेरबंद

सांघिक प्रयत्नांचे यश

 नागरी विकास आणि अनुषंगिक उपक्रम नियोजनबद्ध राबवणारे प्रशासन, लोकप्रतिनिधी, शहरवासीय यांचा सांघिक सहभाग व सकारात्मक प्रतिसादामुळे हे यश प्राप्त करता आले, अशी प्रतिक्रिया सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा महिन्यात कामगिरी

 गतवर्षी मे महिन्यात इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. इचलकरंजी ही महाराष्ट्रातील २८ वी महानगरपालिका बनली. जुलै महिन्यात सुधाकर देशमुख यांनी पहिल्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासन व्यवस्था, उत्पन्न वाढ आदी कामकाजात पाडलेला प्रभाव प्रथम पुरस्कार योग्यतेचा ठरला.