वाढत्या महागाईला आवर घालावा, दरवाढ त्वरीत मागं घ्यावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्यावतीने बुधवारी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयवर तिरडी मोर्चा काढला.
दिवसेंदिवस गॅस, वीज बिलात वाढ आहे. वाढत्या महागाईमुळं घर कसं चालवायचे असा प्रश्न सतावत असताना सरकारने गॅस दरवाढ लादली आहे. या दरवाढीला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी पक्षाच्यावतीने मलाबादे चौकातून मुख्यमार्गावरून तिरडी मोर्चा काढला. शंखध्वनी, घोषणाबाजी करत महागाईच्या प्रतिकात्मक तिरडीचे प्रांतकार्यालयासमोर दहन करण्यात आले.
आंदोलकांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची भेट महागाई त्वरीत कमी न झाल्यास केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तिव्र आंदोलनाचा इशारा दिला. मोर्चात संगिता शेट्टी, शुभांगी शिंदे, सुवर्णा अपराज, पदमाराणी पाटील, कमल रणनवरे, विमल पाटील, सौरभ शेट्टी, अण्णासाहेब शहापुरे, विकास चौगुले, विश्वास बालिघाटे यांच्यासह महिलांचा सहभाग लक्षणिय होता.
