कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षाची सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा येथे शनिवारी न्यायालयाने सुनावली. आशिष अशोक जाधव ( वय ३१, वारे वसाहत , संभाजीनगर) असे या आरोपीचे नाव आहे.

नवीन वाशी नाका येथील एका शीतपेयाच्या कक्षामध्ये आरोपीने शाळेत जाणाऱ्या १४ वर्षीय पीडितेवर फेब्रुवारी २०१९ पासून शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून पीडीता चार महिन्याची गरोदर झाली. तिच्या आईने विचारणा केली असता तिने आशिष जाधव याच्याशी प्रेम संबंध होते. त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते, असे सांगितले.

हेही वाचा : वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कचरा उघड्यावर; कोल्हापूर महापालिकेने केला ५० हजाराचा दंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेच्या आईने करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश श्रीमती पी. एफ. सय्यद यांच्यासमोर झाली. साक्षीदारांची साक्ष, अतिरिक्त सरकारी वकील एस. एस. रोटे यांचा युक्तिवाद, वैद्यकीय अहवाल आदी पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलीस अधिकारी सुनील पाटील. महिला पोलीस अधिकारी सुनीता शेळके. न्यायालय भैरवी सागर पवार यांनी मदत केली.